Thursday, April 25, 2024

/

राजहंस गडाचा राजा परशराम गुणकी तर गडाची राणी तन्वी पाटील

 belgaum

कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे वगळता सातत्याने गेली अनेक दशके राजहंस गड चढणे उतरणे स्पर्धा मध्यवर्तीच्या माध्यमातून भरविली जाते ही अभिनंदनीय बाब असल्याचे मत येळ्ळूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी व्यक्त केले.
मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्याराजहंस गड चढणे उतरणे स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर मध्यवर्ती शिवजयंती मंडळाचे खजिनदार प्रकाश मरगाळे, साहित्य संघ येळ्ळूरचे अध्यक्ष परशराम मोटराचे,डॉ तानाजी पावले,राजू ओऊळकर, विकास कलघटगी,महेश दड्डीकर उपस्थित होते.

यावेळी परशराम मोटराचे यांनीही मोलाचे मार्गदर्शन करून विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले.प्रथम उपस्थित मान्यवर श्री महेश दड्डीकर यांचा हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून स्पर्धेला चालना देण्यात आली दीड वर्षाच्या मुलीपासून ते पंच्याहत्तर वर्षांच्या वयस्करापर्यंत जवळपास पन्नास स्पर्धकांनी यात आपला सहभाग नोंदवला.

 belgaum

यावेळी राजहंस गडाचा राजा परशराम गुणकी तर गडाची राणी तन्वी पाटील यांनीमानाचा ‘किताब पटकावला. अनुक्रमे प्रकाश मरगाळे आणि सतिष पाटील यांच्याहस्ते रोख रक्कम आणि सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.यानंतर इतर विजेत्यांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे आणि प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.Rajahnsgad

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विनोद आंबेवाडीकर,गणेश दड्डीकर,महेश जुवेकर,संजय बाळेकुंद्री, महादेव मंगनाकर,प्रकाश गडकरी,मोतेश बारदेशकर यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव मदन बामणे यांनी केले.
इतर विजेते खालीलप्रमाणेखुला गट- पुरुष
द्वितिय – सदानंद गोसावी-
तृतीय – किसन टक्केकर
१४ वर्षाखालील मुले
प्रथम- मियांश पाटील
द्वितीय- श्रेयश काकतकर
१२ वर्षांखालील मुले
प्रथम – प्रकाश कुणगी
द्वितिय – मनिष पाटील
तृतिय – किरण पाटील

१२ वर्षाखालील मुली
प्रथम – आरोही चित्रगार
द्वितिय – जान्हवी जाधव
तृतीय- शर्वरी दड्डीकर
८ वर्षाखालील मुली.
प्रथम – तन्वी पाटील
द्वितिय – गाथा दड्डीकर
वयस्कर गट
प्रथम – सुरेश देवरमनी
द्वितीय- घोंडीराम शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.