फेटा बांधून घेणे किंवा बांधणे ही फक्त पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात अवरीत सुमारे 14 वर्षे फेटे बांधण्याचे कार्य करून बेळगाव जिल्ह्यासह राज्यात विविध ठिकाणी नांवलौकिक कमावलेल्या बेळगावच्या कांचन किसन शहापूरकर यांची राज्य पातळीवरील यंदाच्या कर्नाटक रत्न पुरस्कारासाठी निवड झाली...
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी महाराष्ट्र शासनाने पूर्ण केली असून महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे आता बेळगावची महत्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी सल्ला देण्यासाठी नेमण्यात आलेल्या तज्ञा समितीच्या समितीचे अध्यक्षपद आता जयंत पाटलांना देण्यात...
बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पोलीस स्थानकात आणि अमली पदार्थांच्या विक्रीवर बऱ्यापैकी आळा आणताना वेगळ्या ठिकाणी धाडी टाकतात अमली पदार्थ जप्त करण्याची साखळी चालूच ठेवली आहे.
बेळगाव शहरात काल मंगळवारी खडे बाजार आणि सी ई एन पोलिसांनी हेरॉईन विक्री...
संगोळी रायान्नानगर मजगाव कॉर्नर येथे रस्त्याशेजारील खांबावर असलेला खुल्या अवस्थेतील विजेचा कनेक्शन बॉक्स ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक ठरत असून याकडे हेस्कॉमने तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे.
संगोळी रायान्नानगर मजगाव कॉर्नर येथील आयटीआय समोरील रस्त्याशेजारी असलेल्या विजेच्या खांबावरील कनेक्शन बॉक्स...
काकती येथील 'हा माझा धर्म' संघटनेतर्फे हेल्पलाइन इमर्जन्सी रेस्क्यू फाउंडेशन बेळगाव (एचईआरएफ) यांच्या सहकार्याने बेळगावात पहिल्यांदाच काकती येथे येत्या रविवार दि. 29 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मोफत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
युवा...
कर्नाटक राज्य वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठीच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सुनील संख आणि शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रकाश हुक्केरी यांनी आज बुधवारी दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
काँग्रेसचे उमेदवार प्रकाश हुक्केरी व सुनील संख यांनी...
कर्नाटकमध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) अर्थात अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था स्थापन करण्यास केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी हिरवा कंदील दाखविला आहे.
कर्नाटकचे आरोग्य मंत्री के. सुधाकर यांनी नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट घेतली. या संदर्भात बोलताना...
टिळकवाडी येथील आरपीडी क्रॉस येथे गेल्या कित्येक महिन्यांपासून गटारीचे पाणी तुंबून दुर्गंधीयुक्त सांडपाण्याची डबक्याची समस्या निर्माण झाली आहे. याबाबत वारंवार तक्रार करून देखील कोणीच त्याची दखल घेत नसल्यामुळे शहरातील बीएसएन रेजिमेंटने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सकाळी गांधीगिरी करत या...
आज मी जो काही आहे तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांच्यामुळे असे सांगून सीमाप्रश्नी अखेरच्या श्वासापर्यंत मी माझ्या सीमावासीय मराठी बांधवांच्या पाठीशी ठाम उभा राहीन, असा संदेश महाराष्ट्र राज्य सभेतसाठी शिवसेनेचे उमेदवार म्हणून नाव निश्चित झालेले कोल्हापूर...
पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये यासाठी हेस्कॉमने हाती घेतलेली ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीची मोहीम अंतिम टप्प्यात आली असून या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 25 ते 500 केव्हीएपर्यंतच्या हजारो ट्रान्सफॉर्मरची तपासणी व दुरुस्ती करण्यात आली आहे.
गेल्या कांही दिवसात सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या वादळी पावसामुळे...