Sunday, July 14, 2024

/

मंत्री जयंत पाटील यांच्याकडे बेळगावची महत्वपूर्ण जबाबदारी

 belgaum

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी महाराष्ट्र शासनाने पूर्ण केली असून महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे आता बेळगावची महत्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.

बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी सल्ला देण्यासाठी नेमण्यात आलेल्या तज्ञा समितीच्या समितीचे अध्यक्षपद आता जयंत पाटलांना देण्यात आलेला आहे. या संदर्भातला ठराव देखील महाराष्ट्र सरकारने 24 मे रोजी केला असून शासनाचे उपसचिव ज जी जवळी यांनी हा नियुक्ती बाबत अधिकृत आदेश काढला आहे.

सीमालढ्याचे आधारस्तंभ आणि माजी मंत्री कै. एन डी पाटील यांच्या निधनानंतर तज्ञ समितीचे अध्यक्षपद रिक्त झाले होते त्या जागी जयंत पाटलांची नियुक्ती करा अशी मागणी मध्यवर्ती समितीने महाराष्ट्र शासनाकडे पत्र लिहीत आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे बेळगाव दौऱ्या दरम्यान केली होती या मागणीची दखल घेत पशासनाने तज्ञा समितीच्या अध्यक्षपदी जयंत पाटील यांची नियुक्ती केली आहे.Jayant p dinesh oulkar

सहा जणांच्या तज्ञ समितीत जयंत पाटील यांना अध्यक्षपद देण्यात आले असून या समितीमध्ये सदस्य म्हणून मूळचे बेळगावचे असलेले महाराष्ट्राचे माजी सनदी अधिकारी दिनेश ओऊळकर तसेच जेष्ठ वकील राम आपटे या दोघा बेळगावकरांचा ही समावेश आहे. सदस्य सचिव म्हणून महाराष्ट्र शासनाचे मुख्य अप्पर सचिव असणार आहेत. तर विशेष निमंत्रित म्हणून वकील र वी पाटील आणि महाराष्ट्र शासनाच्या विधी आणि न्याय विभागाचे प्रधान सचिव वरिष्ठ सल्लागार दोघे असणार आहेत.

12 फेब्रुवारी 2002 साली एन डी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सहा सदस्यीय समिति नियुक्त करण्यात आली होतीआता एन डी पाटील यांच्या निधनानंतर सदर समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर चे आहेत ते नेहमीच ते बेळगावातील समितीच्या नेत्यांच्या संपर्कात असतात सीमा प्रश्नी त्यांची नेहमी तळमळ असते तज्ज्ञ समितीचे अध्यक्षपद त्यांना दिल्याने आता सीमाप्रश्नाच्या लढ्याला एक प्रकारे बळकटी आणि चालना मिळणार आहे.

बेळगाव सीमाप्रश्नी सुप्रीम कोर्टात दावा दाखल करण्यात आलेला आहे त्यात दाव्या संबंधी बैठका घेणे बेळगाव प्रश्नी महत्वाचे निर्णय घेण्याचे काम ही तज्ञ समिती करत असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.