बेळगाव शहरातला गणेशोत्सव कर्नाटक राज्यात सर्वात मोठा असतो. मुंबईच्या धर्तीवर बेळगाव मध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो यामुळे गणेशोत्सवासाठी मंडप उभारणी विद्युत रोषणाई यासाठी मंडळाकडून मोठ्या प्रमाणात तयारी केली जाते.
यासाठी प्रत्येक गणेश मंडळांना विद्युत पुरवठा आवश्यक असतो. यासाठी गणपती मंडळांना डिपॉझिट ठेवावे लागते. मात्र सदर डिपॉझिट घेऊ नये अशी मागणी उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी ऊर्जामंत्र्याकडे केली आहे.
शुक्रवारी बेंगळुरू मुक्कामी आमदार अनिल बेनके यांनी ऊर्जामंत्री सुनील कुमार यांची भेट घेतली. यावेळी सदर मागणीचे निवेदन देत डिपॉझिट रद्द करण्याची मागणी केली आहे. शिवाय गणेशोत्सव काळात मीटरनुसार घेण्यात येणाऱ्या बिलामध्ये सूट मिळावी असे देखील यावेळी त्यांनी सांगितले.
बेळगाव शहरातील गणेशोत्सवाला मोठी परंपरा असून विविध मंडळे मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतात विविध देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिले जातात यासाठी विद्युत पुरवठ्याबरोबरच इतर साहित्य देखील लागते यामुळे सार्वजनिक गणेश मंडपांना विद्युत पुरवठा करण्यासाठी घेण्यात येणारे डिपॉझिट रक्कम घेऊ नये.
याशिवाय मागील वर्षीचे काही मंडळांचे द्यायचे डिपॉझिट तात्काळ देण्यात यावे. याशिवाय गणेशोत्सव काळामध्ये मीटर नुसार घेण्यात येणाऱ्या बिल मध्ये सूट करावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.
या अगोदर अधिकारी आणि गणेश महामंडळाच्या बैठकीमध्ये गणेश महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी डिपॉझिट कमी डिपॉझिट घ्यावे अशी मागणी केली होती.त्यानुसार आता आमदार अनिल बेनके यांनी थेट ऊर्जा मंत्र्यांची भेट घेऊनच ही मागणीचा पाठपुरावा केला आहे.