Wednesday, January 15, 2025

/

‘बिबट्या गोल्फ मैदान जंगलातंच’.. डी एफ ओ

 belgaum

गेल्या पाच दिवसापासून ५० हुन अधिक कर्मचाऱ्यांच्या पिंजऱ्याला चकवा देत असलेल्या बिबट्याचा वावर बेळगाव शहरातील गोल्फ कोर्स मैदान जंगल परिसरात आहे असे स्पष्टीकरण बेळगावचे डेप्युटी रेंज फॉरेस्ट ऑफिसर ऍंथोनी यांनी दिले आहे. गोल्फ कोर्स जंगलात वन विभागाने बसवलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात अडकला आहे असे सांगत आपच्या राहिसवशी जनतेने फलक अलर्ट राहावे मात्र भीती बाळगू नये,शोध मोहिमेत सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

बिबट्याचा वावराची बातमी सोशल मीडिया वृत्तवाहिन्यांनीं चालवली होती मात्र वन खटयाने त्याला अधिकृत रित्या दुजोरा दिला नव्हता अखेर डी एफ ओ याची याबाबतीची पुष्टी करत बिबट्याच्या वावरची कबुली माध्यमांना दिली आहे.

गोल्फ कोर्स मैदाना लगतच्या हनुमान नगर भागात बेळगावातील अनेक व्ही व्ही आय पी लोकं राहात असतात जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त यांच्या बंगल्या सह माजी मंत्री सतीश जारकीहोळी,माजी आमदार फिरोज सेठ, आमदार अंजली निंबाळकर, उद्योजक अनिल पोतदार सह अन्य महनीयांची घरे आहेत.Dfo anthony

वन खात्याने एस डी आर एफ अग्निशामक दल आणि पोलीस खात्याच्या सहकार्याने मिशन बिट्या शोध मोहीम चालूच ठेवली असून यात ५० हुन अधिक वन खात्याचे कर्मचारी, एक ए सी एफ, तीन आर एफ ओ सह गदग हुन आलेले विशेष पथक, शिमोगा हुन आलेले बेशुद्धीचे इंजेक्शन बंदुकीसह सहभागी झालेले डॉक्टर, १२ हुन अधिक ट्रॅप कॅमेरे आणि सात पिंजरे सामील आहेत.

रविवारी रात्री गोल्फ कोर्स जंगल परिसराला लगतच्या २२ शाळांना बिबट्याच्या वावर मुळे सुट्टी देण्यात आली होती मंगळवारी मोहरमची सुट्टी आहे आता या भागातील बुधवारी शाळा सुरु आहेत कि नाही याबाबत अजूनही कोणता आदेश आलेला नाही.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.