बेळगाव येथे एका गवंडी कामगारावर बिबट्याने हल्ला करून दहशत माजवली असतानाच आता जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात देखील बिबट्या आढळून आला आहे.
यामुळे बेळगाव रेस्कोर्स परिसर भितीचे छायेखाली असतानाच मुडलगी तालुक्यातील बिबट्याने एका शेळीचा फडशा पाडला आहे. याबाबतची दृष्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. यामुळे आता बेळगावच नव्हे तर जिल्ह्यात तालुक्यांत बिबट्याची धास्ती वाढली आहे.
गेल्या आठवडाभरापासून रेसकोर्स मैदानावर बिबट्याचे वास्तव्य आहे. खबरदारी म्हणून वनविभागाचे अधिकारी या ठिकाणी तळ ठोकून आहेत शिवाय सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून येथील शाळा देखील बंद करण्यात आले आहेत.
शिवाय सकाळच्या वेळी फिरणाऱ्या मॉर्निंग वॉकर्सना देखील याबाबत सांगण्यात आले आहे यामुळे बेळगाव शहराला लागून असलेल्या परिसरात बिबट्याची दहशत असतानाच आता खानापूर तालुक्यात देखील बिबट्याची भीती निर्माण झाली आहे.
गुरूवारी सकाळी मुडलगी तालुक्यातील धर्मट्टी येथे बिबट्याने एक शेळीचा फडशा पाडला आहे. आता जिल्ह्यात दोन ठिकाणी बिबट्यांचा बिबट्याचा सहवास असल्याचे दिसून येत आहे तत्पूर्वी चिकोडी तालुक्यातील येडुरवाडी येथे बिबटया आढळून आला होता. मात्र आता बेळगाव आणि खानापूर येथे बिबट्याचा वावर आहे.