belgaum

देव तारी त्याला कोण मारी असे म्हटले जाते याचाच प्रत्येय सख्ख्या चुलत भावंडांना आला आहे.भरधाव जाणाऱ्या बस खाली येऊन देखील केवळ दैव बलवत्तर म्हणून दोघे भाऊ या अपघातातून बाल बाल बचावले आहेत. यामुळेच काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला. दोघा भावांनी प्रत्यक्ष मृत्यूचा थरार अनुभवला.

बसवण कुडची येथील सुभाष कल्लाप्पा बेडका वय 40 आणि सुधीर नागप्पा बेडका वय 26 हे दोघे चुलत भाऊ प्रत्यक्ष मृत्युच्या दाढेतून परत आले.केवळ दैव बलवत्तर म्हणूनच हे दोघेही सुदैवाने बचावले आहेत.

बेळगावहुन जमखंडी ला जाणाऱ्या सौंदत्ती बस डेपोच्या परिवहन महामंडळाच्या बसने मागून दुचाकीला धडक दिली
मात्र केवळ सुदैवाने दुचाकी वर बसलेले दोघेही वाचले. बस चालकाने शर्तीचे प्रयत्न करून बस नियंत्रणात आणली.

बेळगाव बागलकोट महामार्गावर निलजी जवळ गुरुवारी दुपारी अडीच वाजता हा अपघात घडला बसवन कुडची हुन सांबऱ्याकडे जाणारी दुचाकी निलजी येथे कुबेर धाब्याजवळ उजव्या बाजूला वळण घेत असताना बसने मागून दुचाकीला ठोकर दिली.Nilji accident

त्यात एकजण बाजूला पडला तर एक जण बसच्या चाका खाली आला. मात्र बस चालकाने शर्तीचे प्रयत्न करून वेळेत बस नियंत्रणात आणली यामुळे दोघीही वाचले.

सदर घटनेत एकजण एक जण किरकोळ जखमी तर एक गंभीर जखमी झाला आहे. या दोन्ही भावंडांनी अनुभवलेला मृत्यूचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. जखमींना लागलीच उपचारासाठी बीम्स मध्ये दाखल करण्यात आले आहे. मारिहाळ पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.