Tuesday, January 7, 2025

/

नरेगा प्रकल्पांतर्गत ८४ तलावांचा विकास : जिल्हाधिकारी

 belgaum

प्रशासन अधिक गतिमान करून विकासाला गती देण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. याबाबत सर्व विभाग व अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. बुधवार (दि. ११) सर्व विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

जनतेच्या आणि सरकारच्या अपेक्षा लक्षात घेऊन सर्व विभागीय अधिकाऱ्यांनी सक्रिय असावे, कोणताही प्रकल्प, कामे, फाईल्स प्रलंबित ठेवू नयेत. सर्व विभाग आणि अधिकारी एकत्रितपणे समन्वयाने काम करतील तेव्हाच जिल्ह्याला श्रेय मिळू शकेल. बेळगाव जिल्हा लोकसंख्येच्या आणि आकारमानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याने येथील प्रगती संपूर्ण राज्याच्या प्रगतीला पूरक ठरणार आहे. त्यामुळे शासनाच्या योजना व विकास योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे येऊ नयेत. यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

सध्या पंधरा हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित आहेत. येत्या काळात कोणत्याही विभागात एकही अर्ज प्रलंबित राहू नये, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी नियमितपणे तालुका कार्यालयांना भेटी देऊन प्रगतीचा आढावा घ्यावा. त्याचप्रमाणे लाभार्थी-आधारित कार्यक्रम अंमलबजावणीचा आढावा घेण्यात यावा, अशा सूचना त्यांनी केल्या. चालू अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या प्रकल्प आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी सुरू झाली असून बंगळुरू येथे नुकत्याच झालेल्या जिल्हा कार्यकारिणी आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रत्येक सूचनेची जिल्हा अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असल्याचे ते म्हणाले. यानंतर नवीन कत्तलखान्याला मान्यता देताना विमानतळाजवळ परवानगी देऊ नये. सध्या अस्तित्वात असलेल्या मांसाच्या दुकानातील कचऱ्याची काळजी घ्यावी घेण्यासंदर्भात देखील त्यांनी महत्वपूर्ण सूचना दिल्या.

या बैठकीला उपस्थित असलेले जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच.व्ही. म्हणाले की, निविदा प्रक्रियेसह सर्व कामे विहित मुदतीत करणे गरजेचे आहे. जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान यासारखे मोठे प्रकल्प राबविण्यास प्राधान्य द्यावे, विकासकामे पूर्ण होण्यापूर्वी जिल्ह्यातील एकूण तलावांची सफाई करण्याबाबत तहसीलदारांनी पुढाकार घ्यावा, असे मत दर्शन एच व्ही यांनी व्यक्त केले.Dc lakes meeting

यावर प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून 84 तलावांचा शोध घेऊन या तलावांचा नरेगा प्रकल्पांतर्गत मॉडेल तलाव म्हणून विकास करण्यात येणार आहे.
तलावाभोवती योग्य कुंपण घालणे आणि पायवाटा बांधल्यास आगामी काळात तलाव ओव्हरफ्लो होण्यास प्रतिबंध होईल, असे ते म्हणाले.

याचप्रमाणे आरोग्य विभागालाही सूचना देत आरोग्य मंत्रालयाच्या , शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व प्रकल्प कार्यान्वित केले जातील याची काळजी घ्यावी, आयुष्मान भारत – हेल्थ कर्नाटक कार्ड मोठ्या प्रमाणात वितरित केले जावे. कोविड तपासणीचे प्रमाण वाढवावे, अशा सूचना केल्या.

एकंदर जनतेला सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी शासनाने एकसंघ राहून काम करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

या बैठकीला अशोक धुडगुंटी, अपर जिल्हाधिकारी डॉ.रुद्रेश घाळी, उपविभागीय अधिकारी रवींद्र करलिंगन्नवर यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.