दि बेळगाव फाइल्स’…वरून कन्नडिगांचा तिळपापड होत असून अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.बेळगाव फाइल्स भयानक आहेत आणि त्या सुद्धा समोर यायला हव्यात असे ट्विट करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी वक्तव्य केलं होतं त्यावर कर्नाटकातून प्रतिक्रिया येत आहेत
संजय राऊत यांचे वक्तव्य म्हणजे लोकांची दिशाभूल करण्याचे एक तंत्र आहे अशी प्रतिक्रिया कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील समस्या मिटवण्यासाठी बेळगाव प्रश्नावर वक्तव्य करणे हे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांचे पूर्वीपासूनच तंत्र आहे असे मुख्यमंत्र्यांनी म्हणून म्हटलं आहे.
1956 चाली भाषावर प्रांतरचना झाले त्या प्रांतरचनेचे कन्नड भाषिकांची संख्या अधिक असलेले अक्कलकोट आणि सोलापूर महाराष्ट्रात राहिलेत तसेच मराठी भाषिक अधिक असलेलं बेळगाव हे कर्नाटकात आहे या गोष्टीला आता पुन्हा पुन्हा उकरून काढण्यात काहीच अर्थ नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.
काश्मीर फाईल सारख्या बेळगाव फाइल्स यायची गरज आहे बेळगाव फाईल्स देखील भयानक आहेत असा ट्विट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होतें.
‘