सोशल मीडियावर मुस्लिम युगाचे खोटे अकाउंट बनवून बागलकोट च्या विधान परिषद सदस्य यांना धमकावले प्रकरणी गोकाकचा एका युवकाला जेलची हवा खायला लागली आहे.
बागलकोट पोलिसांनी सिध्दरुढ श्रीकांत निराळे वय 31 रा. शिंदी कुरबेट्ट गोकाक असे या अटक झालेल्या युवकाचे नाव...
खानापूर तालुक्यातील जागृत देवस्थान श्री क्षेत्र हब्बनहट्टी येथील मारुती रायच्या सानिध्यात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे एकत्रिकरण घडले आहे.गुरुवारी झालेल्या दोन्ही गटांच्या संयुक्त बैठकीत एकी करण्याचा निर्णय झाला असून 4 एप्रिल रोजी खानापूर शिवस्मारकात बैठक होणार असून त्या बैठकी...
बेळगाव महापालिकेकडून यावर्षी जवळपास साडेतीन टक्के कर वाढ असल्याची माहिती मिळताच उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी तात्काळ महापालिका आयुक्त रुदरेश घाळी यांची भेट घेऊन कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना टॅक्स वाढ करण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन सादर केले.
तत्पूर्वी आमदार बेनके...
देसूर (ता. जि. बेळगाव) येथे नव्याने बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरामध्ये प्रतिष्ठापना करण्यासाठी पंढरपूर होऊन बेळगावात दाखल झालेली श्रीराम मूर्ती आज सायंकाळी सवाद्य मिरवणुकीने देसूरला नेण्यात आली.
देसुर येथील मौजे बसवान गल्ली येथे नव्याने बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि मूर्ती...
खोल विहिरीमध्ये पाच-सहा दिवसांपासून अडकून पडलेल्या धामण जातीच्या सापाला पशु मित्र विनायक केसरकर यांनी जीवदान दिल्याची घटना आज गुरुवारी काकती येथे घडली.
काकती येथील शेतातील विहिरीमध्ये एक साप गेल्या पाच-सहा दिवसांपासून भिंतीच्या खोबणीत अडकून पडला असल्याचे शेत मालकाच्या निदर्शनास आले....
गेल्या तीन दिवसात एकही रुग्ण न आढळलेल्या बेळगाव जिल्ह्यात आज गुरुवारी नव्याने 11 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून यापैकी सर्वाधिक रुग्ण हुक्केरी तालुक्यातील आहेत.
जिल्ह्यात आज आढळलेल्या 11 कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी सर्वाधिक नऊ रुग्ण हुक्केरी तालुक्यातील असून प्रत्येकी एक बेळगाव व...
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव जिल्हा व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 8 मे 2022 रोजी मराठा मंदिर बेळगाव येथे तिसरे राज्यस्तरिय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचा जागर होणार आहे. डी.बी.पाटील फोटो स्टुडिओच्या कार्यालयात जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत...
सौंदत्ती रेणुका यल्लमा देवस्थानासह बेळगाव जिल्ह्यातील सर्व हिंदू देवालयांच्या यात्रा काळात आणि देवस्थान परिसरात मुस्लिम धर्मियांकडून केल्या जाणाऱ्या व्यापाराला विरोध करून त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार घालण्याचे आंदोलन श्रीराम सेनेने छेडले असल्याची माहिती श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी दिली.
बेळगाव...
हिंडलगा येथील हनुमान स्पोर्ट्स क्लबतर्फे येत्या शनिवार दि. 9 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता हिंडलगा ग्रा. पं. सदस्य रामचंद्र मन्नोळकर आणि एसएसएस फाउंडेशनचे संस्थापक -चेअरमन संजय सुंठकर पुरस्कृत जिल्हास्तरीय 10 वी हिंडलगा श्री -2022, ग्रामपंचायत स्तरीय 10 वी...
हिंदू देवस्थान परिसरात मुस्लिमांच्या व्यापारास विरोध हा भाजपचा हिडन अजेंडा आहे, अशी टीका केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी आज केली.
शहरातील काँग्रेस भवनमध्ये आज गुरुवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, गेल्या दोन महिन्यात भाजपने शिमोगा घटना आणि हिजाब घटना...