अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव जिल्हा व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 8 मे 2022 रोजी मराठा मंदिर बेळगाव येथे तिसरे राज्यस्तरिय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचा जागर होणार आहे. डी.बी.पाटील फोटो स्टुडिओच्या कार्यालयात जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. अध्यक्षस्थानी ॲड. सुधीर चव्हाण होते.
यावेळी बेळगाव मराठी साहित्य संमेलन लॉकडाऊन मुळे दोन वर्ष घेता आले नाही. आतामात्र बेळगाव ग्रामीण भागातील संमेलन होत असून बेळगाव शहरातील संमेलन कधी होणार साहित्य प्रेमीं च्या नजरा लागून आहेत.
मराठी भाषा , संस्कृती संवर्धनासाठी साहित्य संमेलन ऊर्जास्थाने आहेत. तेव्हा दरवर्षी संमेलन घेण्याचे खंडीत पडू नये म्हणून मे महिन्यात घेण्यासंदर्भात अभामसा परिषदचे राज्याध्यक्ष रवी पाटील यांनी संमेलन भरविण्याबाबत मार्गदर्शन केले. यानुसार चर्चा करून 8 मार्च 2022 रोजी संमेलन घेण्याचे एकमताने निश्चित करण्यात आले.
पहिले संमेलन जेष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांनी संमेलनाध्यक्षपद भूषविले होते . लॉकडॉऊन मध्ये गेल्या वर्षी जेष्ठ पत्रकार श्रीराम पचिंद्रे यांनी ऑनलाईन संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते तर खासदार संजय राऊत उद् घाटक होते .
” *यावर्षी तिसरे राज्यस्तरिय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष महाराष्ट्रातील साहित्यिकाची निवड केली जाणार आहे. सदर संमेलन दोन सत्रात संपन्न होणार आहे* ”
-जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण
यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांची बेळगाव बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले . यावेळी उपाध्यक्ष डी. बी.पाटील , सचिव रणजीत चौगुले ,एम. के. पाटील , सुरज कणबरकर , संजय ईश्वर गुरव ,सतिश जुटेकर , एम . वाय. घाडी व संजय मोरे तसेच महिला उपाध्यक्षा अरुणा गोजे पाटील , स्मिता चिंचणीकर , मनिषा नाडगौडा , रोशणी हुंदरे , सविता वेसणे , स्मिता किल्लेकर उपस्थित होत्या.