Saturday, July 27, 2024

/

प्रेक्षकांत घुसली बैलगाडी : 3 गंभीर जखमी

 belgaum

बैलगाडी शर्यतीप्रसंगी एक बैलगाडी अचानक शर्यत पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये घुसल्याने दोघा युवकांसह एकूण 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना चिक्कोडी तालुक्यातील खडकलाट गावामध्ये घडली. शर्यत सुरू असताना सुदैवाने हा प्रकार घडला नाही अन्यथा अनर्थ घडण्याची शक्यता होती.

खडकलाट गावातील पिसाब उरुसानिमित्त स्थानिक कमिटीने आज मंगळवारी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. यासाठी आसपासच्या परिसरातील बैलगाड्या शर्यतीच्या ठिकाणी हजर झाल्या होत्या.

त्यावेळी एका बैलगाडीचे बैल अचानक उधळले आणि बैलगाडी थेट त्या ठिकाणी उपस्थित प्रेक्षकांमध्ये शिरली. त्यामुळे एकच गोंधळ उडवून धावाधाव झाली. त्यामध्ये जमिनीवर कोसळलेल्यांच्या अंगावरून बैलगाडी गेली.

अचानक घडलेल्या या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी बैलगाडी अंगावरून गेल्यामुळे दोघा युवकांसह एकूण तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटनेची खडकलाट पोलिसात नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.