Daily Archives: Mar 17, 2022
बातम्या
‘होळीचे झाड मिरवणुकीने गल्लीत दाखल’
बेळगाव शहरातील होळी उत्सवामध्ये चव्हाट गल्लीच्या होलिकोत्सवाला खूप महत्त्व आहे तर होळीचे झाड किल्ल्या मधून खास निवड करून आणले जाते यासाठी शेकडो सहभागी असतात युवक किल्ला ते गल्ली पर्यंत अशी मिरवणूक काढून आणले जाते.
होळी दिवशी चवाट गल्लीतील युवक पंच...
लाइफस्टाइल
होळी रे …रंग पंचमी खेळा पण जरा जपुन
उद्या रविवारी होळी, परवा सोमवारी बेळगाव आणि परिसरात रंगपंचमी असे उत्साहाचे वातावरण असणार आहे. या वातावरणात उत्साह असो द्या पण जरा जपून असे आवाहन करण्याची वेळ आली आहे.या सणात पाळायच्या काही टीप्स विशेषतः युवावर्गाने ध्यानात घेण्याची गरज आहे.
होळी पेटविण्यासाठी...
बातम्या
पोलीस ठाण्यासमोर वकिलांचा ठिय्या!
पोलिसांकडून वकिलांना झालेल्या मारबडव प्रकरणी एफआयआर नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ वकीलवर्गातर्फे आज सायंकाळी कॅम्प पोलीस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात आले आहे.
काल बुधवारी रात्री कॅम्प येथील आयनॉक्स चित्रपटगृहांमध्ये दोन गटांमध्ये झालेली मारामारी सोडवून शांतता प्रस्थापित करणाऱ्या वकिलांनाच...
बातम्या
आर. ओ. बेळगावला नमवून सदर्न स्टार अजिंक्य!
कॅनरा बँक ऑफिसर्स असोसिएशनतर्फे हिंडाल्को मैदानावर आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद सदर्न स्टार संघाने पटकाविले, तर आर. ओ. बेळगाव संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
सदर स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सदर्न स्टार संघाने प्रतिस्पर्धी आर. ओ. बेळगाव संघावर 19 धावांनी विजय...
बातम्या
‘बंद’ला मुस्लिम धर्मीयांचा उस्फूर्त प्रतिसाद
हिजाब संदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी मुस्लिम धार्मिक आणि सामाजिक संघटनांनी आज गुरुवारी पुकारलेल्या कर्नाटक बंदला बेळगावात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
कर्नाटकचे अमीर -ए -शरियत (मुख्य पुजारी) मौलाना सगीर अहमदखान रशीद यांनी राज्यव्यापी बंदची हाक देण्याबरोबरच बंद...
बातम्या
जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक आदेश मागे
हिजाब संदर्भातील कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 14 मार्चपासून जारी केलेला प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आज मागे घेतला आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालानंतर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी भादवि कलम 144 अन्वये बेळगाव शहरासह जिल्ह्यात...
बातम्या
पहिले रेल्वे गेट शनिवारी पूर्ण दिवस बंद
रेल्वे खात्याकडून डब्लिंगचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे लेव्हल क्रॉसिंग गेट नं. 383 अर्थात टिळकवाडी येथील पहिले रेल्वे गेट शनिवार दि. 19 मार्च रोजी सकाळी 9 वाजल्यापासून रविवार दि. 20 मार्च रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
तरी...
बातम्या
‘मेरिओट’ हॉटेलमधून हिरेजडित बांगड्या लंपास
काकती नजीकच्या हॉटेल फेअरफिल्ड मेरिओट या हॉटेलवर गंभीर आरोप करण्यात आला असून सदर खाजगी हाॅटेलमधून सुमारे 10 लाख रुपये किंमतीच्या हिऱ्याच्या बांगड्या चोरीला गेल्या आहेत. या प्रकरणी एका महिलेने काकती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हरियाणा राज्यातील गुडगाव येथील...
बातम्या
वकिलांना मारहाण; कामकाजावर बहिष्कार
पोलिसांनी वकिलांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्याची घटना आज गुरुवारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार काल बुधवारी रात्री कॅम्प येथील आयनॉक्स चित्रपटगृहांमध्ये दोन गटांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यवसान मारामारीत झाले.
हे भांडण...
बातम्या
शहरात उन्हाळ्याची चाहूल; वाढू लागला उष्मा
बेळगाव शहरात फेब्रुवारी अखेरपर्यंत असलेला थंडीचा प्रभाव आता मार्चच्या मध्यावधीला पूर्णपणे संपला असून हवेतील उष्म्यात वाढ झाली आहे. या पद्धतीने शहरात उन्हाळ्याची चाहुल लागण्यास सुरुवात झाली आहे.
शहरात गेल्या दोन महिन्यात असलेला थंडीचा कडाका गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे नाहीसा झाला...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...