उद्या रविवारी होळी, परवा सोमवारी बेळगाव आणि परिसरात रंगपंचमी असे उत्साहाचे वातावरण असणार आहे. या वातावरणात उत्साह असो द्या पण जरा जपून असे आवाहन करण्याची वेळ आली आहे.या सणात पाळायच्या काही टीप्स विशेषतः युवावर्गाने ध्यानात घेण्याची गरज आहे.
होळी पेटविण्यासाठी लाकडे जमा करताना निसर्गाचे नुकसान होऊ नये याची काळजी घ्या.
या निमित्ताने होणाऱ्या चोऱ्या थांबवा.
उकाड्याचे दिवस असल्याने जागरण करताना पुरेसे पाणी पीत राहा.
दारू किंवा इतर नशील्या पदार्थांचा अतिरेक टाळा.
एकमेकांवर रंग उडवताना काळजी घ्या, सुके रंग डोळ्यात किंवा तोंडात तसेच कान व नाकात शिरू नयेत याचे भान ठेवा.
ओले रंग तयार करताना त्यात घातक रसायने किंवा दुर्गंधीदायक वस्तू मिसळू नका.
पाण्याचा जपून वापर करा, शक्यतो पाण्याचे फवारे मोठ्याप्रमाणात उडवून ते वाया जाऊ देऊ नका.
अकारण भांडणे, वादावादी टाळा.
जनावरांच्या अंगाला रंग फासू नका.
अंगावरील रंग लवकर निघून जाण्यासाठी रंग खेळण्यापूर्वी शरीराला तेल लावून घ्या.
अपघात घडू नयेत यासाठी वाहने चालविताना भान बाळगा.
हा सण दरवर्षी येतो तेंव्हा उत्साह जपा, त्याच्या अतिरेकातून हिडीस प्रकार होऊ नयेत याची जबाबदारी आपलीच आहे.