Saturday, December 7, 2024

/

व्हेरियंट तसा साधा, मात्र खबरदारी आवश्यक -डॉ. सरनोबत

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सध्या कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असला तरी हा नवा व्हेरिएंट फारसा धोकादायक नाही साधा आहे. तथापि सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी वगैरे आजारांच्या बाबतीत वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रमाणे स्वच्छता वगैरे बाबतीत यापूर्वीच्या कोरोना मार्गदर्शक सूचीचे पालन करावे, असे आवाहन सुप्रसिद्ध डॉ. सोनाली सरनोबत यांनी केले आहे.

देशासह कर्नाटकात कोरोना संसर्गाने पुन्हा आपले डोके वर काढले आहे. कोरोनाचा जेएन.1 हा नवा व्हेरियंट पुन्हा एकदा धोकादायक बनण्याची शक्यता असल्यामुळे राज्य सरकारने जनतेला आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

परिवहन मंडळाच्या बसेसमध्ये 60 वर्षावरील व्यक्तींना फेस मास्क बंधनकारक केल्यानंतर राज्य सरकार आता नववर्षाच्या स्वागत सोहळ्यावर देखील बंधने आणण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव लाईव्हच्या प्रतिनिधीने कोरोनाच्या जेएन.1 व्हेरियंटबाबत माहित जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता डॉ. सरनोबत बोलत होत्या.

त्या म्हणाल्या की, पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या बातम्या आहेत. मात्र कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण कोरोना विषाणूचा जेएन.1 हा जो नवा प्रकार व्हेरियंट आहे, या व्हेरियंटमुळे मनुष्याचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे. को-मोर्बीडीटी म्हणजे कोरोना व्यतिरिक्त शरीर इतर आजारांनी ग्रासले असल्यामुळे हे मृत्यू झाले आहेत. दीर्घ स्वरूपाचा मधुमेह, हृदयविकार आजार, त्याचप्रमाणे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारे आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना संसर्ग झाल्यास यांचा मृत्यू होऊ शकतो. तथापि कोरोनाचा हा जो नवा व्हेरियंट तसा साधाच आहे. सर्दी, ताप, खोकला या खेरीज अंग, सतत दुखणे डोकेदुखी मळमळने अशा प्रकारची लक्षणे या व्हेरियंटमुळे दिसून येत आहेत.Dr sonali sarnobat

याव्यतिरिक्त काहींना भूक लागत नाही, पोटात काही अस्वस्थता जाणवू शकते, काहींना उलटी होण्याची भावना होते. बऱ्याचदा उलटी होते. या स्वरूपाच्या शरीराच्या तक्रारी साधारण पाच-सहा दिवसासाठी असतात. त्यानंतर त्या कमी होतात. मात्र याकडे दुर्लक्ष न करता वेळीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे. वयस्कर 60 वर्षावरील व्यक्तींनी फेस मास्क वापरणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे गर्दीच्या ठिकाणी सरसकट सर्वांनी मास्क वापरणे हितावह असणार आहे.

त्याचप्रमाणे कोरोनासंदर्भात पूर्वी आरोग्य खात्याकडून स्वच्छते संदर्भात जे नियम घालून देण्यात आले आहेत त्यांचे पालन केले जावे. जेणेकरून हा संसर्ग आटोक्यात येऊ शकतो. या व्यतिरिक्त आपल्या फॅमिली डॉक्टर किंवा विशेषज्ञांचा सल्ला घेणे सर्वांसाठी आवश्यक आहे, असे डॉ. सोनाली सरनोबत यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.