Wednesday, October 9, 2024

/

बेळगावचा वैशिष्ट्यपूर्ण दसरा

 belgaum

वेणूग्राम आणि कालांतराने बेळगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव शहराचा इतिहास मोठा आहे, येथील प्रत्येक सणाला एक धार्मिक परंपरा आहे. येथील दसऱ्याच्या सण अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असाच आहे.

सीमोल्लंघन

दरवर्षी विजयादशमीला सीमोल्लंघनाची परंपरा पार पडली जाते. सेंट झेवियर्स किंवा विद्यानिकेतन शाळेजवळील शिलांगण मैदानावर हे सीमोल्लंघन होते,  लहान थोर मंडळी जमा होऊन आपट्याची पाने लुटतात आणि त्यांची देवाण घेवाण करून एकमेकास शुभेच्छा दिल्या जातात. “सोने घ्या सोन्या सारखे रहा” असा संदेश हा सण देतो.

या परंपरेचे प्रमुखत्व बेळगावचे सरपंच, वतनदार आणि देवस्थान पंचकमिटीचे प्रमुख असणारे चव्हाण पाटील निभावतात. सध्या माजी नगरसेवक रणजित चव्हाण पाटील ही प्रथा पार पाडत आले आहेत. शहरातील विविध देवदेवतांच्या सासन काठ्यांची मिरवणूक काढून ती या शिलांगण मैदानावर आणली जाते, तेथे यथायोग्य पूजन करून सोने लुटले जाते

Simmollanghan

(बेळगावातील सीमोल्लंघनाचा संग्रहित फ़ोटो)

कॅम्पचा दसरा

अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणात कॅम्प चा दसरा साजरा होतो. त्यालाही एक मोठी परंपराच आहे. के टी पुजारी आणि त्यांच्या परिवाराने १९०१ मध्ये ही पद्धत सुरू करून रुजवली. येथे पाच ठिकाणी नवरात्रीत दुर्गा पूजन होते, दसऱ्याला या पाचही देवींची मिरवणूक काढून शिलांगण मैदानावर आणली जाते.

के टी पुजारी आणि समूहाची मरिअम्मा देवी, मद्रास बीएचटी विभागाची मुथु मरिअम्मा, फिश मार्केट भागातून कुंती देवी,जुन्या तेलगू कॉलनीची मरिअम्मा अशा देवीचा यामध्ये सहभाग असतो.या पाचही देवी एकमेकींच्या बहिणी मानल्या जातात.

सायंकाळी कॅम्प च्या हाय स्ट्रीट वरून मिरवणूक  काढली जाते, ही मिरवणूक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी असते. संगीत, नाट्य, नृत्य आणि विविध मुखवटे घालून सहभागी होणारे नागरिक हे आकर्षण असते.

शहापुरचा दसरा

बेळगावच्याच शहापूर भागातून निघणारा विठ्लदेव गल्लीतील वेंकटेश्वराचा रथोत्सव हे आणखी एक आकर्षण आहे. तिरुपती येथे ज्याप्रमाणे रथोत्सव होतो तसाच हा उत्सव साजरा केला जातो.

दसऱ्याच्या पूर्वी आठदिवस दररोज वेगळ्या वाहनांनी सजावट मिरवणूक काढली जाते, यात हत्ती, गरुड,मारुती, मोर, घोडा या वाहनांचा समावेश असतो.

मुख्य रथोत्सव मोठा असतो. असाच उत्सव  बसवान गल्ली भावे चौक येथील वेंकटेश्वर मंदिरातूनही काढला जातो.

शहापूर येथील मंदिर नाईक कुटुंबियांचे आहे. मागील २०० वर्षांपेक्षा अधिक काळापासून इथे उत्सव होतो., ही परंपरा आजही कायम आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.