बेळगाव : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु झालेल्या युद्धामुळे हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेन युद्धग्रस्त भागात अडकले होते. या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी भारत सरकार 'ऑपरेशन गंगा'च्या माध्यमातून प्रयत्न करत असून आतापर्यंत अनेक विद्यार्थी भारतात सुखरूप परतले आहेत.
बेळगावमधील एकूण २० विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत...
बेळगाव : कर्नाटकचे आर्थिक सर्वेक्षण २०२१-२२ नुसार दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत बेळगाव जिल्हा पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. २०२१-२२ च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार बेळगाव जिल्ह्याचा क्रमांक एकूण ३० जिल्हांमध्ये २२ वा आहे. (पीसीआय डेटा २०१९-२०) तर बेंगळूर अर्बन पहिल्या स्थानावर आहे.
२०१८-१९...
कर्नाटक राज्याचे महामहिम राज्यपाल थावरचंद गहलोत हे बेळगाव येथील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री कपिलेश्वर मंदिराला भेट देणार आहेत.मंगळवारी राज्यपाल गेहलोत हे राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या समारंभात सहभागी होणार आहेत त्या निमित्ताने ते बेळगाव दौऱ्यावर आहेत सायंकाळी पाच वाजता...
मी पब्लिकसाठी आहे पब्लिसिटीसाठी नव्हे ...असं उत्तर विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी यांनी दिलं.विधान परिषद निवडणुक जिंकताच आपण बेळगाव ग्रामीण मतदारसंघात दिसत आहात यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी बेळगाव ग्रामीण च्या आमदारांना खोचक टोमणा मारत मी पब्लिक साठी...
बेळगाव सुवर्ण विधानसौधमधील विविध दुरुस्ती कामांसाठी १.५ कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या असून या दुरुस्ती कामांतर्गत पोलीस फ्रिस्किंग बूथ आणि सामान्य शौचालयाची दुरुस्ती,
प्रेशर टँक, कर्बस्टोन पेंटिंग, व्हर्टिकल ब्लाइंड्सची दुरुस्ती, मंत्री कक्षात नवीन व्हर्टिकल ब्लाइंड्स, सोफा कव्हर, दक्षिण आणि पश्चिम...
नियोजित बेळगाव - धारवाड रेल्वेमार्गाचा आराखडा बदलून के के कोप्प मार्गे वळविण्यात यावा, असा आग्रह करत आज बेळगाव मध्ये शेतकऱ्यांनी निदर्शने केली. शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा चौकात धरणे आंदोलन करत शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले. यानंतर खासदार मंगला अंगडी यांच्या कार्यालयावर...
बेळगावात सदाशिवनगर आणि शहापूर स्मशानभूमीत इको फ्रेंडली पद्धतीने अंतिम संस्कार करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी सुरेंद्र अनगोळकर समाजसेवा फौंडेशनच्या वतीनं करण्यात आली आहे.
सोमवारी मनपाचे आरोग्याधिकारी संजीव डुमगोळ यांनां निवेदन देत मागणी केली आहे.सदाशिव नगर आणि शहापूर हिंदू स्मशानभूमी बेळगाव...
मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या एका बीएसएफच्या कॉन्स्टेबलने आपल्या सहकाऱ्यांवर बेछूट गोळीबार केल्याने झालेल्या घटनेत पाच जवानांचा मृत्यू झालाय तर दहा जण जखमी झाले आहेत.
भारत पाकिस्तान सीमेवर पंजाब येथील अमृतसर जवळ बी एस एफ कॅम्प मध्ये रविवारी सायंकाळी ही घटना घडली...
राजे शहाजी राजे यांचे होदेगिरी येथील समाधीला भेट देण्यासाठी. व समाधीच्या सुधारणा कार्यक्रमाला चालना मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत यासाठी पुढील वाटचाल आखण्यासाठी मराठा समाजातर्फे कार्यकर्ते रवाना झालेले आहेत.
त्याचबरोबर मराठा समाजाचे स्वामी मंजुनाथ स्वामी यांचा सत्कार 15 मे रोजी बेळगाव येथे...
बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुरगोड शाखेतून 4 कोटींचे दागिने चोरीला गेले आहेत.चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात यश मिळवले आहे.
बेळगाव जिल्हा पत सहकारी बँकेच्या (BDCC) मुरगोड शाखेतून रविवारी 4.37 कोटी रुपयांची रोकड आणि 1.65 कोटी रुपयांचे दागिने लंपास करण्यात...