Sunday, May 5, 2024

/

शॉक लागून अभियंत्याचा मृत्यू

 belgaum

खाजगी कंपनीच्या नव्या मोबाईल यंत्रणेची खांब्यावर जोडणी करतेवेळी विद्युत वहिनीचा झटका बसून अभियंत्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी टिळकवाडी पहिला गेट नजीक घडली.
महेश फकीरआप्पा मुदनाळकर (वय 24) रा.देसाई गल्ली काकती असे मयत झालेल्या अभियंताचे नाव आहे. टिळकवाडी पहिला गेट जवळ खाजगी कंपनीचे नवीन केबल जोडणीचे काम सुरू होते यावेळी महेश मुदनाळकर हा युवक हॅस्कॉमच्या खांबाला ॲल्युमिनियमची सीडी लावून वायर जोडण्याचे काम करतेवेळी विद्युत दाहिनी चा झटका बसल्याने यात छातीच्या डावी बाजू जळली गेली

आणि त्यात तो खाली कोसळल्याने गंभीर अवस्थेत प्रथम उपचारासाठी खासगी इस्पितळात नेण्यात आले ही घटना गंभीर असल्याचे सांगताच तातडीने केएलई रुग्णालय दाखल करण्यास नेले असता डॉक्टरानी तपासणी करून मृत झाल्याचे घोषित करण्यात आले.

या घटनेचा गुन्हा टिळकवाडी पोलीस स्थानकात नोंद झाला असून पोलिसांनी त्या खाजगी कंपनी वर 304 A दुर्लक्ष केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याचा पुढील तपास करीत आहेत.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.