बेळगाव लाईव्ह : मालमत्तेच्या वादातून दोघांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना यरगट्टी तालुक्यातील जीवापूर गावात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
रमेश हणमंत नाईकर (वय 29) आणि बसव्वा भीमाप्पा नाईकर (वय 60) अशी हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत. मालमत्तेच्या कारणावरून निर्माण झालेला वाद या दुहेरी हत्याकांडामागे असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मालमत्तेच्या मुद्द्यावरून सुरू असलेला वाद विकोपाला गेल्याने दोघांना आपला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी मडिवाळर यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
एकाच गावात दोन जणांची हत्या झाल्याने जीवापूर परिसरात भीती आणि हळहळ व्यक्त होत आहे.




