belgaum

गांजाविक्री प्रकरणी तिघांना अटक

0
Cop bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील इंडस्ट्रियल एरिया, ऑटो नगर परिसरात गांजा विक्री करणाऱ्या तिघा जणांच्या टोळीला बेळगाव शहर सीसीबी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. गुरुवारी (दि. २६) करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी २ किलो १२० ग्रॅम गांजा आणि एक दुचाकी जप्त केली आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबी विभागाचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक आणि पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ भजंत्री यांच्या पथकाने ऑटो नगर येथील श्री लक्ष्मी सॉ मिलजवळील सार्वजनिक ठिकाणी ही धडक कारवाई केली. यावेळी दुचाकीवरून गांजाची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवानंद ऊर्फ परश्या सुक्कण्णावर (वय २३, रा. परकणट्टी, हिडकल डॅम, ता. हुक्केरी), नागराज रामचंद्र भोवीवड्डर (वय २४, रा. सुब्बय्या कॅम्प, हिडकल डॅम, ता. हुक्केरी) आणि लखन केंपण्णा काटाबळी (वय २६, रा. चिलभावी, हिडकल डॅम) या तिघांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून मोटारसायकलसह २ किलो १२० ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपींनी हा अमली पदार्थांचा साठा महाराष्ट्रातील शिरपूर (जि. धुळे) येथील रहिवासी असलेल्या राजेश चौहान नावाच्या चौथ्या व्यक्तीकडून आणल्याची कबुली दिली आहे.

 belgaum

याप्रकरणी चारही आरोपींविरोधात माळमारुती पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. अमली पदार्थ तस्करीविरोधात केलेल्या या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी सीसीबी पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे.


गांजा सेवन करणाऱ्या दोघांवर मार्केट पोलिसांची कारवाई; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद वावर करणाऱ्या दोघांविरोधात मार्केट पोलिसांनी कारवाई करत त्यांच्यावर एन डीपी एस कायद्यान्वये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.

शिवाजी नगर दुसऱ्या क्रॉस परिसरात सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद वावरताना आढळलेल्या राजेश गंगाराम इंगळे (वय २२, रा. शिवाजी नगर, बेळगाव) याला मार्केट पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हुसेनसाब केरूर आणि त्यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता त्याने मादक पदार्थाचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरू आहे.

दुसऱ्या घटनेत महाद्वार रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद वावरत असलेल्या पुनीत महातेश करजगीमठ (वय १८, रा. कपिलेश्वर कॉलनी, बेळगाव) याला उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी व पथकाने ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीत त्यानेही अमली पदार्थ घेतल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याविरोधात मार्केट पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा नोंदवून तपास सुरू ठेवण्यात आला आहे.

दोन्ही प्रकरणांची तातडीने दखल घेऊन कारवाई केल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांच्या पथकाचे पोलीस आयुक्त तसेच पोलीस उपायुक्तांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.