belgaum

बेळगाव पोलिसांची धडक मोहीम

0
Police logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच अवैध धंद्यांचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी धडक कारवायांची मोहीम राबवली आहे. या अंतर्गत धारदार शस्त्र बाळगणाऱ्या एका संशयितासह मटका आणि जुगार अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी एकूण १५ जणांना अटक केली आहे.

मार्केट पोलीस ठाण्याच्या ‘अँटी स्टॅबिंग स्कॉड’ पथकाने पी.डब्ल्यू.डी. क्वार्टर्स परिसरात गस्त घालताना धारदार चाकू घेऊन संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या लक्ष्मण बसप्पा सुतार (वय ४७, रा. रामनगर, बेळगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात शस्त्र कायदा आणि कर्नाटक पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत मार्केट पोलिसांनी भातखंडे गल्लीतील शासकीय इमारतीजवळ सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकून राहुल देवानंद अंबळे (वय ३५, रा. बडकळ गल्ली, बेळगाव) याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून १,७८० रुपये रोख आणि मटका चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या. तसेच वीरभद्रनगर सातव्या क्रॉस परिसरात जुगारावर टाकलेल्या छाप्यात अमीरखान सलीमखान कित्तूर (वय ३२, रा. वीरभद्रनगर), सायद फारुख इरापूर (वय १९, रा. सुभाषनगर), साहिल मैनुद्दीन मुल्ला (वय २३), मोहम्मदराज सय्यदकबीर मुल्ला (वय २५, रा. देशपांडे गल्ली) आणि सिकंदर दादापीर हुंडेकरी (वय २३, रा. आझादनगर) या पाच जणांना अटक करून ७,३०० रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले.

 belgaum

दरम्यान, मारिहाळ पोलिसांनी कलकांब गावच्या हद्दीतील हिरोजी यांच्या शेतातील एका झाडाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून आठ जणांना अटक केली.

यामध्ये कृष्णा मारुती पाटील (वय ३०, चंदगड), आनंद मलकप्पा सिगर (वय ३८, सगरनगर-कणबर्गी), मंजुनाथ करेप्पा तळवार (वय ३०, आंबेडकर गल्ली-कणबर्गी), महेश लक्ष्मण मोदगे (वय ३८, सुभाष गल्ली), बसवराज यल्लप्पा बुड्डी (वय ३०, बुद्र्यानूर), ईरप्पा परशुराम जिरगौडा (वय ३१, एकलव्यनगर-कणबर्गी), प्रवीण यल्लप्पा नाईक (वय २७, मुचंडी) आणि विनायक शिवाजी कोळजीगौडा (वय ३१, मुचंडी) यांचा समावेश आहे. घटनास्थळावरून पसार झालेल्या अन्य ६ जणांचा पोलीस शोध घेत असून या कारवाईत १४,३४० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.