28 C
Belgaum
Sunday, February 25, 2024
 belgaum

Daily Archives: Mar 31, 2022

मोहन कारेकर यांची जायंट्स वेल्फेअर फौंडेशनच्या विशेष समिती सदस्यपदी निवड*

बेळगाव शहर आणि परिसरात गेल्या छत्तीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे संस्थापक सदस्य मोहन कारेकर यांची जायंट्स वेल्फेअर फौंडेशन या जागतिक स्थरावर काम करणाऱ्या संघटनेच्या विशेष समिती सदस्यपदी निवड करण्यात आली. गेल्या छत्तीस वर्षापासून जायंट्स मेनचे सचिव,खजिनदार,...

श्री चषक क्रिकेट स्पर्धा यांनी जिंकले सामने

श्री स्पोर्ट्स क्लब खडक गल्ली आयोजित 'श्री चषक -2022' निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील आज गुरुवारी झालेल्या सामन्यांमध्ये यूपी इलेव्हन, झॅन स्पोर्ट्स, जीजी बॉईज आणि जीजी स्पोर्ट्स संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय संपादन केले. टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो...

बारा कोटींच्या विकास कामांना चालना- बुडा बैठक

बेळगाव शहराच्या उत्तर भागात आमदार अनिल बेनके यांनी बारा कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना गुरुवारी चालना दिली मूलभूत सुविधा रस्ते नाला ड्रीनेज सीडी वर्क अश्या विविध विकास कामाना अनिल बेनके यांनी सुरुवात केली. ढोर गल्ली भडकल गल्ली कोतवाल गल्ली रोड या...

या’ मार्गांवर पोलिसांकडून वाहन चालक वेठीस

बेळगाव शहरात ठिकठिकाणी लक्ष देऊन वाहतूक नियंत्रणासह रहदारी नियमांची अंमलबजावणी करण्याऐवजी रहदारी पोलिसांकडून वाहनचालकांना वेठीस धरण्याचे प्रकार हिंडलगा आणि गणेशपूर रोडवर घडत असल्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले असून वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. बेळगाव शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस...

बेळगावच्या धावपटूची राष्ट्रीय स्तरावर चमक

बेळगावचा आघाडीचा धावपटू विश्वंभर लक्ष्मण कोलेकर याने कोलकता येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ऑल इंडिया रेल्वे ॲथलेटिक चॅम्पियनशिप या क्रीडा महोत्सवात चमकदार कामगिरी नोंदविताना घवघवीत यश संपादन केले आहे. कोलकता येथील ऑल इंडिया रेल्वे ॲथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारतीय रेल्वे खात्याचे देशभरातील...

गुढीपाडवा ‘धार्मिक दिन’ म्हणून साजरा करावा

मुजराई खात्याअंतर्गत येणाऱ्या राज्यातील सर्व मंदिरांनी हिंदू नववर्षाचा पहिला दिवस उगादी अर्थात गुढीपाडवा हा 'धार्मिक दिन' म्हणून साजरा करावा, अशी सुचना राज्यसरकारने केल्यामुळे कर्नाटक मुजराई खात्याच्या मंत्री शशिकला ज्वोल्ले त्यादिवशी विशेष पूजा विधी करणार आहेत. सरकारच्या सूचनेनुसार गुढीपाडव्यादिवशी सर्व अधिकृत...

कुत्र्यांच्या नसबंदी मोहीम कंत्राटासाठी निविदा

बेळगाव शहरातील मोकाट कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेसाठी कंत्राटदार निश्‍चिती येत्या 20 एप्रिल रोजी होणार असून कुत्र्यांची नसबंदी व अँटी रेबीज लसीकरण तसेच आजारी व रेबीजची लागण झालेल्या कुत्र्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने काल बुधवारी ई -निविदा काढली आहे. सदर निविदा प्रक्रिया 20...

शिवजयंती चित्ररथ महामंडळाची 5 एप्रिलला बैठक

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्त बेळगावमध्ये दरवर्षी शिवरायांचे सजीव देखावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. बेळगाव शहर व उपनगरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सवच्यावतीने दरवर्षी बेळगावकरांच्या डोळ्याचे पारणे फिटेल असे शिवरायांच्या जीवनातील वेगवेगळ्या प्रकारचे सजीव देखाव्याचे आयोजन...

राज्यस्तरीय स्पर्धेत उमेश गंगणे ‘बेस्ट पोझर’

बेळगावचा होतकरू शरीरसौष्ठवपटू उमेश गंगणे याने बसवन कुडची येथे आयोजित कलमेश्वर बसवेश्वर श्री -2022 या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सुयश मिळवताना 'बेस्ट पोझर' हा किताब हस्तगत केला आहे. बसवन कुडची येथील भीम वाल्मीकी युवा संघटनेतर्फे काल बुधवारी राज्यस्तरीय कलमेश्वर बसवेश्वर श्री...

श्री मंगाई ट्रॉफी -2022; शौर्य स्पोर्ट्स अजिंक्य!

वडगाव येथील श्री मंगाईदेवी परिसरात आयोजित केल्या जाणाऱ्या श्री मंगाई ट्रॉफी -2022 हाफ पीच टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद कपलेश्वर रोड शौर्य स्पोर्ट्स संघाने पटकाविली आहे. पिरनवाडीच्या सनसेट वॉरियर्स या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. गेल्या 15 वर्षापासून वडगाव मंगाई देवी...
- Advertisement -

Latest News

ग्रामस्थांना टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा.. यांचा उपक्रम

बेळगाव लाईव्ह - गेल्या वर्षी पावसाने ओढ दिली.त्यामुळे यावर्षी संपूर्ण बेळगाव जिल्ह्यावरच पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. याची...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !