Wednesday, April 17, 2024

/

राज्यस्तरीय स्पर्धेत उमेश गंगणे ‘बेस्ट पोझर’

 belgaum

बेळगावचा होतकरू शरीरसौष्ठवपटू उमेश गंगणे याने बसवन कुडची येथे आयोजित कलमेश्वर बसवेश्वर श्री -2022 या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सुयश मिळवताना ‘बेस्ट पोझर’ हा किताब हस्तगत केला आहे.

बसवन कुडची येथील भीम वाल्मीकी युवा संघटनेतर्फे काल बुधवारी राज्यस्तरीय कलमेश्वर बसवेश्वर श्री -2022 शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेतील ‘बेस्ट पोझर’ हा मानाचा किताब बेळगावचा शरीरसौष्ठवपटू उमेश गंगणे याने पटकाविला.Umesh gangne

 belgaum

याखेरीज त्याने स्पर्धेतील 60 किलो वजनी गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देखील मिळविले. सदर स्पर्धेपूर्वी बुधवारी झालेल्या बेळगाव मराठा युवक संघाच्या 56 व्या बेळगाव श्री -2022 या जिल्हास्तरीय स्पर्धेत देखील उमेश गंगणे याने 60 किलो वजनी गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे.

जोशी गल्ली शहापूर येथील उमेश लक्ष्मण गंगणे हा शहापूर कारपोरेशन जिम्नॅशियममध्ये व्यायामाचा सराव करतो. उपरोक्त यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.