Friday, May 24, 2024

/

शिवजयंती चित्ररथ महामंडळाची 5 एप्रिलला बैठक

 belgaum

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्त बेळगावमध्ये दरवर्षी शिवरायांचे सजीव देखावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

बेळगाव शहर व उपनगरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सवच्यावतीने दरवर्षी बेळगावकरांच्या डोळ्याचे पारणे फिटेल असे शिवरायांच्या जीवनातील वेगवेगळ्या प्रकारचे सजीव देखाव्याचे आयोजन करण्यात येत असते.

या वर्षी 2022 ची चित्ररथ संदर्भात कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी श्री शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवजयंती उत्सवाच्या नियोजनासाठी मंगळवारी दिनांक 5 रोजी बैठक आयोजित केली आहे.

 belgaum

धर्मवीर संभाजीराजे चौकातील दुर्गादेवी मंदिर जत्तीमठ येथे सायंकाळी 5 वाजता बैठक होणार आहे. बैठकीला शहर व उपनगरातील सर्व शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते,युवक मंडळे, सामाजिक संस्था व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनिल जाधव व सरचिटणीस जे बी शहापुरकर उपाध्यक्ष मेघन लंघरकांडे ,रवी निर्मळकर,
संतोष कणेरी, संपर्कप्रमुख प्रसाद मोरे,आदित्य पाटील, प्रभाकर देसुरकर, ओमकार पुजारी ,चंद्रकांत माळी, राजन जाधव,विनायक बावडेकर,यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.