Thursday, March 28, 2024

/

बारा कोटींच्या विकास कामांना चालना- बुडा बैठक

 belgaum

बेळगाव शहराच्या उत्तर भागात आमदार अनिल बेनके यांनी बारा कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना गुरुवारी चालना दिली मूलभूत सुविधा रस्ते नाला ड्रीनेज सीडी वर्क अश्या विविध विकास कामाना अनिल बेनके यांनी सुरुवात केली.

ढोर गल्ली भडकल गल्ली कोतवाल गल्ली रोड या ठिकाणचे काँक्रिटचे रस्ते हनुमान नगर टीव्ही सेंटर मधील शाहूनगर भागातल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार आणि बेनके यांनी केलं.

आमदारांनी घेतला बुडाच्या विकास कामांचा आढावा

 belgaum

बेळगाव उत्तर मतदार संघामध्ये बेळगाव शहर विकास प्राधिकरणाकडून (बुडा) राबवण्यात येत असलेली विकास कामे आणि भविष्यातील विकास कामांबाबत आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज गुरुवारी आढावा बैठक घेतली. Devlopment work

बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज गुरुवारी बुडा कार्यालयांमध्ये बुडाचे अध्यक्ष, संचालक आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत उत्तर मतदारसंघात बुडाकडून राबविण्यात येत असलेल्या विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली. सध्या हाती घेण्यात आलेली कामे आणि भविष्यातील विकास कामाबद्दल आढावा घेताना आमदारांनी उद्यान -वनाचा विकास, समुदाय भवन निर्मिती, रस्ते, गटारी, डेकोरेटिव्ह लाइट्स आदींच्या कामांची माहिती घेतली.

पाण्याची समस्या दूर करण्यासाठी आवश्यक भागात बोरवेल मारून जनतेची सोय करण्याच्या दृष्टीनेही यावेळी चर्चा झाली. बैठकीस बेळगाव दक्षिणचे आमदारांसह अध्यक्ष संजय बेळगावकर, बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे, संचालक मल्लीकार्जून सत्तीगेरी, हिरेमठ आदींसह बुडाचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.