१ जानेवारी रोजी नवीन वर्षाची सुरुवात आपण करत नाही, हे प्रत्येकाला माहीत आहे. दुर्दैवाने चुकीच्या संगतीमुळे धर्मस्थळ, इस्कॉनसह अनेक देवालयात नव्या वर्षाच्या प्रारंभी अनेक कार्यक्रम आयोजिण्यात आले.
नववर्ष साजरे करण्यात आले. यासंदर्भात विरेंद्र हेगडे यांनी माफी मागावी, अशी मागणी श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी केली. बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांसोबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यासोबतच रविशंकर गुरुजींनी नव्यावर्षाच्या प्रारंभी इतर धर्मगुरूंच्या सानिध्यात येऊन नववर्ष साजरे केले.
हे योग्य नाही. पुढील वर्षी नव्या वर्षाचे स्वागताचे आचरण करणार नाही, अशी ग्वाही त्यांनी द्यावी. अन्यथा देवालय, मठांसमोर आपण धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. धर्मपरिवर्तनासाठी प्रेरित करणाऱ्यांच्या सानिध्यातून दूर राहण्याचा सल्लाही प्रमोद मुतालिक यांनी दिला आहे.
राज्यात गोहत्या निषेध विधेयक संमत करण्यात आले. या विधेयकात जसे चांगले मुद्दे आहेत तशीच कमतरताही आहे. कसाई खान्यासंदर्भात या विधेयकात कोणताही उल्लेख करण्यात आला नाही. १३ वर्षाच्या जनावराच्या हत्येवर कोणतीही बंदी नाही. अशा त्रुटी या विधेयकात असून गोहत्या बंदी विधेयकात संपूर्ण गोहत्येवर बंदी घालणे गरजेचे होते, असे प्रमोद मुतालिक म्हणाले. गोहत्येसंदर्भात गावस्तरावर समिती नेमण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली.
बेळगावच्या लोकसभा पोटनिवडणुकीविषयी बोलताना ते म्हणाले कि, लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा माझा विचार असून वरिष्ठ नेत्यांशी याबाबतीत चर्चा करण्यात आली आहे. नेत्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. योग्य असेल तर मला उमेदवारी नक्की मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.