कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक सीमाभाग महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे वक्तव्य १७ जानेवारी रोजी पाळण्यात आलेल्या हुतात्मादिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते.
त्या वक्तव्यावरून कर्नाटकातील राजकीय नेते आणि कन्नड संघटनांनी थयथयाट सुरु केला आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावरून कन्नड...
आरोग्य विभाग आणि बीम्सची प्रगती आढावा बैठक
जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्याची आरोग्यमंत्र्यांनी केली सूचना
जनतेला परवडणारी आणि विनामूल्य आरोग्य सेवा पुरविणे हे सरकारचे कर्तव्य आहे. यासंदर्भातील सरकारच्या अनेक योजना आहेत, त्या अंमलात आणून जनतेपर्यंत सर्व सोयी सुविधा पोहोचवाव्यात अशा सूचना आरोग्य...
सीमाभाग महाराष्ट्रात आणण्यास कटिबद्ध असल्याचे वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना कर्नाटकची इंचभर जागादेखील महाराष्ट्राला मिळणार नाही. उलट त्यांचे सोलापूर व सांगली प्रदेश कर्नाटकात सामील करून घेऊ, अशी दर्पोक्ती कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी...
पाटोदा ग्रामपंचायत गेली २५ वर्षे सांभाळत आदर्श सरपंच म्हणून बिरुदावली मिळवणाऱ्या भास्कर राव पेरे पाटलांना सीमावासियांच्या तळतळाट भोवला आहे. गेल्या २ दिवसांपूर्वी बेळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सीमावासीयांना 'दिल्या घरी तू सुखी राहा' असा अनाहूत सल्ला दिला.
सीमाप्रश्नाची तळमळ आणि...
१७ जानेवारी रोजी पाळण्यात येणाऱ्या हुतात्मा दिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक सीमाभाग महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. या वक्तव्यानंतर सीमाभागासह संपूर्ण राज्यात कन्नड संघटना आणि नेत्यांचा थयथयाट सुरु झाला असून आज कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा...
कोरोना प्रादुर्भावामुळे भक्तांच्या आरोग्याच्या हितार्थ जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून सौंदत्ती (जि. बेळगाव) तालुक्यातील श्रीक्षेत्र यल्लमा देवस्थान येत्या दि. 22 जानेवारीपासून दि. 9 फेब्रुवारी 2021 पर्यंत पुजाविधी आणि दर्शनासाठी बंद असणार आहे.
श्रीक्षेत्र यल्लमा देवस्थानाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे तसे जाहीर केले आहे. एकीकडे...
कोरोना प्रादुर्भावामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशावरून गेल्या या सुमारे 10 महिन्यांपासून बंद असलेले न्यायालयाचे प्रत्यक्ष कामकाज मार्गदर्शक सूचीचे पालन करत आज अखेर पूर्ववत सुरू झाले आहे. त्यामुळे आज बेळगाव न्यायालय आवार पक्षकार आणि वकिलांच्या गर्दीने फुललेले पहावयास मिळाले.
कोरोना प्रादुर्भावाची वाढत्या...
बेळगाव न्यायालयासमोरील डबल रोड अर्थात मुख्य दुपदरी हमरस्ता दिवसेंदिवस धोकादायक ठरत असून आजपासून न्यायालयं सुरू झाल्यामुळे धोका अधिकच वाढला आहे. तेंव्हा या रस्त्यावर न्यायालयासमोर गतिरोधके बसविण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
राणी कित्तूर चन्नम्मा चौकातून आरटीओ सर्कलकडे जाणाऱ्या बेळगाव न्यायालयासमोर...
बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक जानेवारी -फेब्रुवारी 2019 मध्ये झाली असती परंतु माजी नगरसेवकांनी दावा दाखल केल्यामुळे ती लांबणीवर पडली. मात्र आता आज 2018 मधील मर्यादांच्या आधारावर 58 प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
बेळगाव महापालिकेची निवडणूक प्रलंबित असली तरी ती आता...
हुबळी रेल्वे स्टेशनचे नुतनीकरणाचे काम पुढे ढकलण्यात आल्याने यापूर्वी रद्द करण्यात आलेल्या 19 एक्सप्रेस रेल्वे गाड्या पूर्ववत धावणार असल्याची माहिती नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागाने दिली आहे.
धारवाड -सोलापूर -धारवाड ही पॅसेंजर रेल्वे मात्र पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे रद्द करण्यात आली आहे.
हुबळी -हैदराबाद...