कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीररीत्या महापालिकेसमोर लावण्यात आलेला लाल-पिवळा ध्वज हटविण्यात यावा, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.
आज यासंदर्भात जिल्हा शिवसेना कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी...
बेळगाव तालुक्यात बकरी मृत्यूच्या घटना वाढल्या असून यामध्ये मेंढपाळांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनांचे गांभीर्य प्रशासनाने ओळखावे तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राज्य शेळी मेंढी पालन विकास महामंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे करण्यात आली...
महानगरपालिकेसमोर फडकविण्यात आलेला लाल - पिवळा ध्वज अनधिकृतरित्या उभारण्यात आला असून प्रशासनाने कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करून त्वरित हा ध्व्ज हटविण्यात यावा अन्यथा मराठी भाषिक जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत देण्यात आला....
ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर आता अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार अध्यक्ष व उपाध्यक्षांचा कार्यकाळ 30 महिन्यांचा असणार आहे. त्याचप्रमाणे अध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित केल्यानंतरच उपाध्यक्ष पदाचे आरक्षण ठरविण्याची सूचना आयोगाने दिली आहे.
ग्रामपंचायतींच्या बाबतीत याआधी काँग्रेस व...
स्टार एअर कंपनी येत्या 25 जानेवारीपासून नाशिकला आपली नवी विमानसेवा सुरू करत असल्यामुळे आता बेळगावकरांना महाराष्ट्रातील 3 शहरांना विमान प्रवास करता येणार आहे. यापूर्वी बेळगावातून मुंबई व पुणे या शहरांना विमानसेवा देण्यात आली होती.
महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर म्हणून ओळखल्या...
आपल्या विभागातील लेव्हल क्रॉसिंग गेटचा अडथळा दूर करताना नैऋत्य रेल्वेने गेल्या वर्षभरात आपल्या विभागात 6 रोड ओव्हर ब्रिज (आरओबी), 77 रोड अंडर ब्रिज (आरयुबी) आणि लिमिटेड हाईट सबवेज (एलएचबी) बनविले आहेत.
गेल्या 29 सप्टेंबर 2020 रोजी निवृत्त रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक...
बेळगावमधील कित्तूर जवळील कुल्लहळ्ळी जंगल परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून हरणांची शिकार करणाऱ्या शिकाऱ्याला अरण्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी आज अटक केली होती.
परंतु अटक करण्यात आलेला शिकारी अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून फरारी झाला आहे. या कारवाईत शिकारीसाठी वापरण्यात आलेल्या वस्तू हस्तगत करण्यात...