17 रोजी बेळगाव दौऱ्यावर असणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या विशेष अतिरिक्त बंदोबस्त अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस महानिरीक्षक सीमा लाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्या निमित्ताने 16 व 17 रोजी लाटकर या बेळगाव दौऱ्यावर येत आहेत.
राज्य पोलिसमहा संचालक...
ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने युवक घटनास्थळी जागीच ठार झाल्याची घटना हलग्या जवळ पुणे बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे.
आकाश यल्लप्पा पाटील वय 22 रा. बस्तवाड हलगा असे या अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.गुरुवारी सायंकाळी सव्वा सात वाजता हा...
बेेेळगाव शहरातील कपलेश्वर रेल्वे ओव्हर ब्रिज ते जुना पी. बी. रोड रेल्वे गेट दरम्यानच्या रेल्वे मार्गाचा वापर सध्या चक्क दुचाकीस्वारांकडून केला जात असून या धोकादायक प्रकाराला तात्काळ आळा घालण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
कांही अतिउत्साही मंडळींकडून शॉर्टकट म्हणून कपलेश्वर...
खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी येथील किडनी विकाराने त्रस्त असलेल्या राहुल बिदरभावीकर या 20 वर्षीय तरुणाच्या उपचारासाठी अनेक दानशूर व्यक्ती मदतीसाठी पुढे येताना दिसत आहेत. चव्हाटा स्पोर्ट्स खानापूर यांच्यावतीने खानापूर येथे आयोजीत हॅथवे ट्रॉफी भव्य क्रिकेट स्पर्धेचे औचित्य साधून राहुल याला...
प्रेम प्रकरणातून कथितरित्या पेटवून दिलेल्या विद्यानगर, खानापूर येथील एका महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यामुळे कदंबा फाउंडेशनने हेल्प फॉर नीडीच्या मदतीने त्या महिलेवर अंत्यसंस्कार केल्याची घटना नुकतीच घडली.
दोन महिन्यांपूर्वी प्रेमप्रकरणातून विद्यानगर, खानापूर येथील एका महिलेला कथितरित्या...
बर्ड फ्लूच्या धास्तीने आठवड्याभरात चिकनचे भाव गडगडले असून शहरातील चिकन विक्रीत 30 टक्क्यांनी घट झाली आहे. याखेरीज अंड्यांचा दर देखील शेकडा 400 रुपये इतका घसरला आहे.
कोरोना संक्रमणादरम्यान देशावर बर्ड फ्ल्यूचे संकटही घोंगावताना आणि वाढताना दिसून येत आहे. सध्या कर्नाटकात...
कर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळात आता बेळगावातील तब्बल 5 मंत्र्यांचा समावेश असून इतर बरीच निगम व महामंडळे बेळगावच्या अखत्यारीत आहेत. त्यामुळे बेळगाव हे राज्यातील एक शक्ती केंद्र म्हणून उदयास आले आहे.
बेळगाव जिल्ह्यामध्ये हे पाच मंत्री आहेत. ज्यामध्ये परिवहन मंत्री व उपमुख्यमंत्री...
आज मकर संक्रांति दिवशी बेळगाव शहरात अफवांचे जणू पिकच पसरवले जात असून काय खरे? - काय खोटे? असा संभ्रम नागरिकात निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. तथापि अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन सोशल मीडियावर करण्यात येत...
आपल्या हवाई संपर्क क्षेत्राला नवी चालना देताना बेळगाव विमानतळाने आपल्या हवाई मार्गांमध्ये आता आणखी एका नव्या मार्गाची भर घातली आहे. स्पाईस जेट विमान कंपनीने मुंबईमार्गे बेळगाव ते दुबई अशी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू केली आहे.
स्पाईस जेट विमान (एसजी -3745) बेळगाव...