फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या कार्यकर्त्यांनी जखमी झालेल्या किंगफिशर पक्षाला जीवनदान दिले.गुडस शेड रोड येथे किंग फिशर पक्षी जखमी अवस्थेत असल्याचे फेस फ्रेंड्स सर्कलचे कार्यकर्ते सुनील चोळेकर यांना दिसून आले त्यांनी ही माहिती संतोष दरेकर यांना दिली दरेकर यांनी त्वरित तेथे धाव घेऊन त्याला..
कापसात ठेवले पिल्लू असल्याने आणि त्याच्या पायाला आणि पंखाला दुखापत झाल्याने उडता येत नव्हते हे दरेकर यांच्या लक्षात आहे.
नंतर त्यांनी त्याला पाणीही पाजवले पाणी पाजवल्या नंतर ते पिल्लु थोडे ताजे तवाने झाले आणि हालचाल करू लागले नंतर संतोष दरेकर आणि सुनील चोळेकर यांनी किंग फिशरच्या पक्षाला वन खात्याच्या कार्यालयात नेले तेथे उपस्थित असलेल्या वन खात्याच्या कर्मचाऱ्यांकडे जखमी किंग फिशरच्या पिल्लाला सुपूर्त केले..
पिल्लाच्या पायाला आणि पंखाना दुखापत झाली आहे त्याच्या उपचार करा अशी विनंती त्यांनी वन खात्याला केली. संतोष दरेकर यांनी रक्तदानाच्या माध्यमातून सुरू केलेली समाज सेवा रुग्णांना मदत आता आता पक्षी व प्राणी प्रेमा पर्यंत पोहोचली.