Thursday, March 28, 2024

/

24 तासात राज्यात 248 रुग्ण : 2,781 झाली बाधितांची संख्या

 belgaum

कर्नाटक राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार गेल्या 24 तासात राज्यात नव्याने 248 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. यापैकी रायचूर जिल्ह्यात सर्वाधिक 62 रुग्ण आढळून आले असून बेळगाव जिल्ह्यात मात्र सलग दुसऱ्या दिवशी एकही बाधित रुग्ण आढळून आला नाही.

कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्यातर्फे जाहीर करण्यात आलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार गुरुवार दि 28 मे सायंकाळी 5 वाजल्यापासून आज शुक्रवार दि. 29 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 248 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 2,781 झाली आहे. यापैकी 894 जणांना आत्तापर्यंत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात राज्यात ॲक्टिव्ह केसेस 1,837 असून यापैकी 15 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाल्यामुळे राज्यातील मृतांची संख्या 48 झाली असून यापैकी दोघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे. नव्याने आढळून आलेल्या 248 रुग्णांमध्ये एका आंतरराष्ट्रीय प्रवाशाचा आणि 227 आंतरराज्य प्रवाशांचा समावेश आहे.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांपैकी रायचूर (62), कलबुर्गी (61) व यादगिरी (60) या जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. याउलट बेळगाव, बिदर, मंगळूर, बागलकोट, कारवार, गदग व कोलार जिल्ह्यामध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही. कर्नाटकातील एकूण 29 जिल्हे कोरोनाग्रस्त असून या जिल्ह्यातील रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 12 – एकूण रुग्ण 303), मंड्या (2 -257), कलबुर्गी (61 -251), यादगिरी (60 -223), उडपी (15 -164), दावणगिरी (4 -146), बेळगाव (0 -146), हासन (4 -144), चिकबळ्ळापूर (5 -136), रायचूर (62 -134), बिदर (0 -120), मंगळूर (0 -97), म्हैसूर (2 -92), विजयपुरा (4 -85), बागलकोट (0 -77), कारवार (0 -75), बेल्लारी (9 -47), धारवाड (1 -43), चित्रदुर्ग (1 -38), शिमोगा (1 -35), गदग (0 -35), तुमकुर (2 -30), कोलार (0 -19), चिकमंगळूर (2 -18), बेंगलोर ग्रामीण (1 -14), हावेरी (0 -10), कोप्पळ (0 -4), कोडगु (0 -3) आणि रामनगर (आज 0 – एकूण रुग्ण 1). याखेरीज 34 जण राज्याच्या अन्य भागातील आहेत

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.