बेळगाव शहराच्या सीसीबी पोलिसांनी अमली पदार्थ विकणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडून त्यांच्या जवळील जवळपास दोन लाख 70 हजाराचे अफीम आणि इतर सामुग्री जप्त केली आहे.
रोहिताश बिष्णोई वय 24 मूळचा जोधपूर राजस्थान सध्या राहणार एम. के.हुबळी बेळगाव आणि राजकुमार बिष्णोई मूळचा जोधपूर राजस्थान सध्या राहणार रुक्मिणी नगर बेळगाव अशी अटक केलेल्या दोघा अफीमची तस्करी करणाऱ्या युवकांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 ऑक्टोबर रोजी शहर गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सीसीबीचे पोलीस निरीक्षक निंगणगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ऑटोनगर टाटा पॉवर प्लांट जवळ संशयास्पद रित्या फिरत अफीमची विक्री तस्करी करणाऱ्या या दोघांना रंगेहाथ पकडले.
त्यांच्या जवळील दोन लाख 70 हजार किंमतीचे 325 ग्रॅम वजनाचे अफीम एक स्विफ्ट कार दोन मोबाईल तीन हजार रुपये रोख रक्कम जप्त केला आहे. या प्रकरणी सीईएन पोलीस स्थानकात गुन्हा देखील नोंद करण्यात आला आहे.
अफीमची तस्करी करणाऱ्या राजस्थानी युवकांना अटक करणाऱ्या शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील आणि सहकाऱ्यांचे कौतुक पोलीस आयुक्त एम बी बोरलिंगय्या यांनी केले आहे.दोघेही युवक राजस्थान मधून आणून अमली पदार्थ बेळगावात विक्री करत होते काय याचा तपास सुरू आहे.