Daily Archives: Oct 4, 2022
क्रीडा
डीवायईएस ज्युडो सेंटरचे घवघवीत यश
बेळगावच्या डीवायईएस ज्युडो सेंटरच्या ज्युडो खेळाडूंनी म्हैसूर येथे नुकत्याच पार पडलेल्या सीएम चषक राज्यस्तरीय दसरा क्रीडा महोत्सवामध्ये 5 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्यपदकं पटकावून घवघवीत यश संपादन केले. त्याचप्रमाणे ज्युडो मधील मुलींच्या विभागाचे सर्वसाधारण अजिंक्यपद देखील हस्तगत केले...
बातम्या
श्री दुर्गादेवी मूर्ती विसर्जनासाठी तलाव सज्ज
बेळगाव शहरातील महापालिकेच्या नव्या तलावाची स्वच्छता करण्यात आली असून उद्या विजयादशमीनंतर होणाऱ्या श्री दुर्गादेवी मूर्ती विसर्जनासाठी हा तलाव सज्ज ठेवण्यात आला आहे.
सालाबाद प्रमाणे यंदा देखील नवरात्र उत्सवानिमित्त बेळगाव शहरात ठीकठिकाणी श्री दुर्गामाता देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. शहरात जवळपास...
क्रीडा
दुखापतीवर मात करत ‘ती’ ठरली अजिंक्य!
दुखापती वर मात करत बेळगावच्या सृष्टी अरुण पाटील या युवा क्रीडापटूने कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आयोजित केएसए लोहपुरुष -2022 या प्रतिष्ठेच्या ट्रायथलाॅन शर्यतीचे विजेतेपद हस्तगत करून बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित केएसए लोहपुरुष (आयर्न मॅन) ट्रायथलाॅन...
बातम्या
गोसावी मठाला मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट
दसऱ्यानिमित्त बेंगळुरू येथील मराठा समाजाच्या गोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी मठातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
सदिच्छा भेटीप्रसंगी कर्नाटकातील मराठा समाजासाठी विशेष योजना राबविल्याबद्दल तसेच अनुदान मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री बोम्माई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी...
बातम्या
खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दीला उधाण!
खंडेनवमी आणि दसऱ्यानिमित्त खरेदीसाठी शहराच्या बाजारपेठेत सध्या नागरिकांच्या गर्दीला उधाण आले आहे. त्यामुळे ठीक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवताना दिसत आहे.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे नवरात्रोत्सव काळात बाजारपेठा शांत होत्या. मात्र यंदा सर्व निर्बंध हटविण्यात आल्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी...
बातम्या
रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्याला ‘यांनी’ दिला मदतीचा हात
पिरनवाडी औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या एका इसमाला सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचा हात देऊन त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची घटना काल सोमवारी रात्री घडली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, पिरनवाडी औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्यावर काल सोमवारी रात्री एक इसम रस्त्यावर बेशुद्ध पडला होता....
बातम्या
46 गाळेधारकांना दुकान खाली करण्याची नोटीस
बेळगाव शहरातील महापालिकेच्या मालकीच्या विविध व्यापारी संकुलातील 46 गाळेधारकांना काल सोमवारी नोटीस बजावण्यात आली असून दुकान गाळे सोडण्यासाठी त्यांना 5 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
महापालिकेने नोटीस बजावलेल्या गाळेधारकांमध्ये जुना धारवाड रोडवरील संकुल, सीबीटी कॉम्प्लेक्स, माळ मारुती, चावी मार्केट व...
बातम्या
सिमोल्लंघनासाठी शहरवासियांना आवाहन
सालाबाद प्रमाणे बेळगाव शहर देवस्थान मंडळाच्यावतीने उद्या बुधवार दि. 5 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 5:30 वाजता ज्योती कॉलेज (मराठी विद्यानिकेतन) मैदानावर सिमोल्लंघन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सिमोल्लंघनादिवशी चव्हाण गल्लीतील पंच कमिटीच्यावतीने श्री ज्योतिबा देवाची सासन काठी व नंदी (कटल्या)...
बातम्या
शेतकऱ्यांना चिंता ‘करपा’ची
नेहमीच कोणत्या ना कोणत्या पद्धतीने नुकसान झेलणाऱ्या शेतकऱ्यांसमोरील समस्यांची रांग संपता संपत नसल्याचे दिसून येत आहे. अतिवृष्टी, पूर यासारख्या समस्या तर नेहमीच्या आहेतच पण आता पिकांवर 'करपा'चे संकट ओढवले आहे.
बळ्ळारी नाला परिसरातील शेतकऱ्यांची अतिवृष्टीने पीकं गेली तर उर्वरित भागातील...
बातम्या
ऋचा पावशे हिचा पोलीस आयुक्तालय युनिटच्या वतीने सत्कार
नीट (NEET) परीक्षेत देशात चौथ्या क्रमांकावर आलेल्या कु. ऋचा पावशे हिचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालय युनिटच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याचप्रमाणे एसएसएलसी आणि पीयूसी विभागात ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुलांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...