Friday, March 29, 2024

/

रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्याला ‘यांनी’ दिला मदतीचा हात

 belgaum

पिरनवाडी औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या एका इसमाला सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचा हात देऊन त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची घटना काल सोमवारी रात्री घडली.

याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, पिरनवाडी औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्यावर काल सोमवारी रात्री एक इसम रस्त्यावर बेशुद्ध पडला होता. रस्त्यावर लोकांची ये -जा असली तरी असहाय्य अवस्थेत पडलेल्या त्या इसमाला मदत करण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नव्हते.Allan more

ही बाब आपल्या मित्रासमवेत येथून जाणारे सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे यांच्या निदर्शनास आली. तेंव्हा त्यांनी आपला मित्र सॅम्युअल राॅड्रीग्ज यांच्या मदतीने त्या इसमाला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

 belgaum

डॉक्टरांकडे चौकशी केली असता लो ब्लड प्रेशरमुळे तो इसम बेशुद्ध पडल्याचे त्यांना कळाले. तेंव्हा ॲलन मोरे यांनी त्या इसमाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्याचप्रमाणे त्याला त्याच्या मूळगावी विजापूरला पाठवण्याची व्यवस्थाही केली. ॲलन मोरे यांच्या या स्तुत्य कृतीची प्रशंसा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.