belgaum

आनंदनगरात विवाहितेचा संशयास्पद मृत्यू! घातपाताचा आरोप

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील आनंदनगर परिसरात ३३ वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पुनम अमित डेळेकर (वय ३३) असे मृत महिलेचे नाव असून, तिचा मृत्यू हा नैसर्गिक किंवा आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी रंजन मर्वे रयत गल्ली वडगाव याच्यावर आरोप करत फिर्याद दाखल केली आहे.

पुनम या एका कार्यालयात काम करत होत्या. रंजन याच्याशी त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून ओळख होती.  मयत विवाहितेने स्वतःचे घर सोडून भाड्याच्या घरात राहण्यास सुरुवात केली होती, अशी माहिती देखील मिळाली आहे.

मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास पुनम यांचा मृत्यू झाल्याची माहिती रंजन याने त्यांच्या कुटुंबीयांना दिली. पुनम यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्याने सांगितले. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या कुटुंबीयांना पुनम यांचा मृतदेह पलंगावर आढळून आल्याने त्यांनी संशय व्यक्त केला.

 belgaum

कुटुंबीयांनी तसेच पोलिसांनी घरातील परिस्थितीची पाहणी केली असता, घरातील स्वयंपाकघरात मद्याच्या बाटल्या आढळून आल्याने मृत्यूपूर्वी घरात पार्टी झाली असावी, असा संशयही कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. पुनम यांची हत्या करून आत्महत्येचा बनाव करण्यात आल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बिम्स रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. उत्तरीय तपासणी अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.