belgaum

अनुष्का आपटेची राज्य नाट्य स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी रौप्यपदकाची हॅट्ट्रिक!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह:नाट्य आणि संगीत क्षेत्रात आपल्या अभिनय व गायनकौशल्याची छाप उमटवणाऱ्या अनुष्का आपटे हिने राज्य नाट्य स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी रौप्यपदक पटकावण्याचा मान मिळवला आहे. 2024, 2025 आणि 2026 अशा सलग तीन वर्षांत रौप्यपदक मिळवत तिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

2 नोव्हेंबर 2026 रोजी मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात अनुष्काचा रौप्यपदक देऊन गौरव करण्यात आला. सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजय गोखले यांच्या हस्ते तिला हे पदक प्रदान करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार उपस्थित होते.

अनुष्का हिने तीन वेगवेगळ्या नाटकांमधील आपल्या अभिनय आणि गायनाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. 2024 मध्ये ‘संगीत लावणी भुलली अभंगाला’, 2025 मध्ये ‘संगीत आनंदमठ’ आणि 2026 मध्ये ‘संगीत शाकुंतल’ या नाटकांसाठी ती राज्य नाट्य स्पर्धेच्या रौप्यपदकाची मानकरी ठरली.

 belgaum

विशेष म्हणजे, या यशाबरोबरच अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे अनुष्काला 2025 आणि 2026 अशी सलग दोन वर्षे सर्वोत्कृष्ट गायिका-अभिनेत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

एकापाठोपाठ एक मिळवलेल्या या पुरस्कारांमुळे अनुष्काने नाट्यसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयासोबतच गायन क्षेत्रातील तिचे सातत्यपूर्ण योगदान आणि मेहनतीची ही पोचपावती मानली जात आहे.

सलग तीन वर्षे राज्य नाट्य स्पर्धेत रौप्यपदक आणि सलग दोन वर्षे सर्वोत्कृष्ट गायिका-अभिनेत्री पुरस्कार मिळवणाऱ्या अनुष्का आपटे हिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.