बेळगाव लाईव्ह |
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने किणी टोलनाक्यावर आंदोलन सुरू करण्यात आल्याने कोल्हापूर पोलिसांनी महामार्गावरील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग जाहीर केले आहेत.
कर्नाटक, कोल्हापूर, सांगली, पुणे आणि मुंबई या दिशेने प्रवास करणाऱ्या अवजड वाहनांसह चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र वाहतूक मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग
१. कर्नाटकातून महाराष्ट्राकडे जाणारी अवजड वाहने :
लक्ष्मी टेकडी येथून वाहतूक वळविण्यात येणार आहे. पुढे कागल – पलूस – एमआयडीसी – इचलकरंजी – सांगली या मार्गाने वाहने जातील. सांगलीहून विटा – रहिमतपूर – सातारा मार्गे पुन्हा NH-48 महामार्गावर प्रवेश करता येईल.
२. पुणे-मुंबईहून कर्नाटकाकडे जाणारी अवजड वाहने :
सातारा येथून वाहतूक वळविण्यात येणार असून रहिमतपूर – विटा – सांगली – इचलकरंजी – कागल – पलूस – एमआयडीसी मार्गे NH-48 वरून कर्नाटकाकडे जाता येईल.
चारचाकी वाहनांसाठी पर्यायी मार्ग
३. कर्नाटक आणि कोल्हापूरहून सांगलीकडे जाणारी वाहने :
सांगली फाट्यापर्यंत वाहने जाऊ शकतील. त्यानंतर हातकणंगले – वडगाव – आष्टा – विटा – रहिमतपूर – सातारा मार्गे NH-48 वर जाता येईल.
४. पुणे-मुंबईहून येणारी चारचाकी वाहने :
सातारा येथून रहिमतपूर – विटा – आष्टा – वडगाव – हातकणंगले – सांगली फाटा या मार्गाचा वापर करावा.
५. टोकासंभापूरहून कोल्हापूरकडे जाणारी वाहने :
कोल्हापूर शहरात जाण्यासाठी वडगाव मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाहनचालकांना पोलिसांचे आवाहन
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी पोलिसांनी निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचाच वापर करावा. अवजड वाहनांनी विशेषतः वाहतूक नियमांचे पालन करावे. प्रवासासाठी अतिरिक्त वेळ राखून ठेवावा तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
किणी टोलनाक्यावरील शेतकरी आंदोलनामुळे NH-48 वरील वाहतुकीचे नियोजन बदलण्यात आले असून बेळगावसह कर्नाटकातून महाराष्ट्राकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी प्रवासापूर्वी पर्यायी मार्गांची माहिती घेणे आवश्यक आहे.




