Daily Archives: Oct 7, 2022
बातम्या
पुरानंतर आता भात पिकावर करप्याचे संकट
करपा रोग पडू लागल्यामुळे बेळगाव शहरानजीकच्या शहापूर, अनगोळ, वडगाव, येळ्ळूर शिवारातील बासमती व इंद्रायणीसह इतर भात पिकं धोक्यात आली असून पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
बेळगाव शहरासह तालुक्यात अलीकडे कांही दिवसांपासून ऊन...
बातम्या
‘यांच्या’ मदतीमुळे बेपत्ता इसम सुखरूप स्वगृही
घरातून बेपत्ता झालेल्या अथणी येथील एका इसमाला सेवाभावी संघटना एफएफसीचे प्रमुख संतोष दरेकर यांनी आपले सहकारी मित्र आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने सुखरूप स्वगृही धाडल्याची घटना आज घडली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, सामाजिक कार्यकर्ते फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे (एफएफसी) प्रमुख संतोष...
बातम्या
मागणी रस्ता दुरुस्तीची, मात्र तात्पुरती डागडुजी
जुना पी. बी. रोड येथील छत्रपती शिवाजी रेल्वे ओव्हर ब्रिजवरील रस्त्याच्या पायथ्याशी पडलेल्या धोकादायक खड्ड्यांसंदर्भात बेळगाव लाईव्हसह सोशल मीडियावर आज जोरदार आवाज उठवण्यात येताच युद्धपातळीवर खड्डे बुजवून रस्त्याची तात्पुरती करण्यात आली.
जुना पी. बी. रोड येथील छ. शिवाजी रेल्वे ओव्हर...
शैक्षणिक
प्रा. डॉ. सुचेता कुलकर्णी यांना आंतरराज्य पुरस्कार
नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फौंडेशन आणि हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी यांच्यावतीने बेळगावच्या बी. ई. सोसायटी संचलित मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या डॉ. सुचेता उदय कुलकर्णी यांना आंतरराज्य गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
शहरातील धर्मनाथ भवन येथे उद्या शनिवार दि. 8...
बातम्या
गांधीगिरी… ब्रिजच्या रस्त्यावरील खड्ड्यात लावले नारळाचे झाड
जुन्या पी. बी. रोडवरील छ. शिवाजी रेल्वे ओव्हर ब्रिजच्या जिजामाता चौकाकडील टोकाशी रस्त्यावर पडलेल्या धोकादायक खड्ड्यांमध्ये चक्क नारळाचे झाड लावून शहर प्रशासन व स्मार्ट सिटी लिमिटेडचा धिक्कार केला जात आहे.
जुन्या पी. बी. रोडवरील छ. शिवाजी रेल्वे ओव्हर ब्रिज जिजामाता...
बातम्या
ग्रा. पं. आर्थिक व्यवहारांसाठी आता पीडीओ अधिकृत!
राज्यातील ग्रामपंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांकडील कांही अधिकार काढून घेण्यात आली असून आता यापुढे विविध परवानग्या व ई -प्रमाणपत्रावर ग्रामपंचायत विकास अधिकारी (पीडिओ) किंवा द्वितीय दर्जा लेखाधिकारी (एसडीएए) यांची स्वाक्षरी अधिकृत मानली जाईल.
ग्रामपंचायतींना मंजूर झालेल्या निधीच्या पैशात गैरवार होऊ नये...
बातम्या
‘त्या’ दुहेरी खुनांच्या तपासासाठी 3 तपास पथके कार्यरत
सुळेभावी (ता. बेळगाव) येथील हादरवून सोडणाऱ्या दुहेरी खुनाच्या घटनेचा छडा लावण्यासाठी पोलिसांची तीन विशेष तपास पथके नियुक्त करण्यात आली असून या पथकाने त्यांच्यावर सोपविलेली कामगिरी पार पाडण्यास सुरुवात केली आहे.
बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या सुळेभावी गावात गुरुवारी रात्री घडलेल्या...
बातम्या
तात्काळ आणखी एका कौटुंबिक न्यायालयाची मागणी
मोठ्या प्रमाणातील खटल्यांमुळे बेळगावच्या एकमेव जिल्हा कौटुंबिक न्यायालयावरील ताण तर वाढला आहेच शिवाय जनतेचीही गैरसोय आहे. याची दखल घेऊन बेळगाव येथे आणखी एक कौटुंबिक न्यायालय तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
जिल्ह्याचे मुख्य केंद्र असलेल्या बेळगाव...
बातम्या
नैऋत्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना 56.28 कोटी बोनस
रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना उत्पादकता निहाय बोनस (प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस) जाहीर करण्यात आला असून नैऋत्य रेल्वेच्या एकूण 32 हजार 358 रेल्वे कर्मचाऱ्यांना 56.28 कोटी रुपयांचा बोनस मिळणार आहे पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसाच्या वेतनाच्या आधारावर प्रत्येकी सुमारे 17 हजार 951 रुपये...
Latest News
अधिवेशन विरोधी समितीचा लढा कसा असणार? बैठकीचे आयोजन
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधी मंडळ अधिवेशनविरोधी महाराष्ट्र एकीकरण लढ्याची रूपरेषा शनिवारी ठरण्याची शक्यता आहे.
मध्यवर्ती समितीच्या 11 जणांची बैठक...