Sunday, December 22, 2024

/

रौप्य महोत्सवी दैवज्ञ ब्राह्मण संघातर्फे विविध स्पर्धा, कार्यक्रम

 belgaum

दैवज्ञ ब्राह्मण संघ बेळगावच्या रौप्य महोत्सवानिमित्त येत्या 1 व 2 नोव्हेंबर रोजी भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे विवाहाची 50 वर्षे पूर्ण केलेल्या दांपत्यांचा सत्कार, मान्यवरांचा सत्कार, सामाजिक संस्थांचा सत्कार आदी विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

पहिल्या दिवशी 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता शालेय मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेतली जाईल. स्पर्धेकरिता पहिली ते दुसरीसाठी घर किंवा वृक्ष, तिसरी ते चौथीसाठी पावसाळ्यातील प्रसंग, पाचवी ते सातवीसाठी पतंग उडवणारी मुले आणि आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणेशोत्सव मिरवणूक हे विषय असणार आहेत.

याच दिवशी दुपारी 12 वाजता फॅन्सी ड्रेस स्पर्धा होईल. ही स्पर्धा वय वर्षे 3 ते 5, 6 ते 8 आणि 9 ते 11 अशा तीन गटात घेतली जाईल. देवदेवता, साधुसंत, राष्ट्रपुरुष वगळता इतर कोणत्याही वेशभूषा करता येतील. यानंतर दुपारी 3 वाजता महिलांसाठी सोलो किंवा ग्रुप नृत्य स्पर्धा आणि सायंकाळी 6 वाजता होम मिनिस्टर स्पर्धा घेतली जाईल.

दुसऱ्या दिवशी 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता रांगोळी स्पर्धा, 11 वाजता पाककला (नॉनव्हेज ड्राय पदार्थ) स्पर्धा आणि दुपारी 12 वाजता मेहंदी स्पर्धा (दुसऱ्याच्या हातावर मेहंदी काढणे) घेतली जाईल. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता बक्षीस वितरण देणगीदारांचा सत्कार आणि सामाजिक संस्थांचा सत्कार सोहळा संपन्न होईल. या सोहळ्यानंतर सायंकाळी 6 वाजता स्वरसंध्या हा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम होणार असून रात्री 8 वाजता स्नेहभोजनाने दोन दिवसाच्या कार्यक्रमांची सांगता होईल.

उपरोक्त स्पर्धेत भाग घेऊ मंगळवार दि. 25 ऑक्टोबरपर्यंत नांव नोंदणी करावी. तसेच अधिक माहितीसाठी दैवज्ञ ब्राह्मण संघाचे पदाधिकारी राजू बेकवाडकर, नितीन कलघटकर, विशाल शिरोडकर, दीपक अडकुरकर, देविदास काकतीकर, हेमंत मुतकेकर, अतुल पारिश्वाडकर, नितीन नंद्याळकर किंवा विवेक चिंचणेकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.