Tuesday, January 7, 2025

/

शिवसेना किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात

 belgaum

दीपावलीनिमित्त शिवसेना (सीमाभाग बेळगाव) यांच्यातर्फे गतवर्षी आयोजित शिवकालीन भव्य किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज शनिवारी सायंकाळी उत्साहात पार पडला.

शहरातील मारुती गल्ली येथील श्री मारुती मंदिर येथे शिवसेनेच्या 2021 सालच्या किल्ला स्पर्धेचा हा बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला होता. शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या समारंभात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते किल्ला स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात आली.

याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख दिलीप बैलूरकर, उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, प्रवीण तेजम, राजकुमार बोकडे, महेश गावडे, प्रकाश भोसले, प्रदीप सुतार, प्रकाश हेब्बाजी आदिसह शिवसैनिक आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.Fort making comp

किल्ला स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे आहे. बेळगाव विभाग :1) स्वराज्य मित्र मंडळ भांदूर गल्ली बेळगाव, किल्ले -श्री अटक पैजा प्रांत, 2) श्री मरगाई ग्रुप भांदूर गल्ली बेळगाव, किल्ले -विजयदुर्ग, 3) धर्मवीर संभाजी युवक मंडळ ताशिलदार गल्ली, किल्ले -लोहगड. शहापूर विभाग : 1) ओम युवक मंडळ भारतनगर चौथा क्रॉस शहापूर, किल्ले -वरदगड, 2) वारणा ग्रुप पवार गल्ली शहापूर, किल्ले -पद्मदुर्ग, 3) कट्टा ग्रुप पवार गल्ली शहापूर, किल्ले -संतोष गड.

वडगाव विभाग : 1) शिवतलवार युवक मंडळ लक्ष्मीनगर वडगाव, किल्ले -प्रतापगड, 2) नरवीर तानाजी युवक मंडळ कारभार गल्ली वडगाव किल्ले -चंदन वंदन, 3) लक्ष्मी गल्ली वडगाव, किल्ले -देवगिरी. अनगोळ विभाग : 1) सिद्धिविनायक युवक मंडळ झेरे गल्ली कोनवाळ अनगोळ, किल्ले -राजगड, 2) संत रोहिदासनगर चौथा क्रॉस अंनगोळ, किल्ले -त्रिशूना पकृ.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.