पाचवी गल्ली शिवाजीनगर येथील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या 16 वर्षीय शालेय विद्यार्थ्यांचा मुचंडी गावानजीच्या शेतवाडीत दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची खळबळ जनक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तपास कार्य हाती घेतले असून खून नेमका कशासाठी झाला? कोणी केला? याचा शोध घेतला जात आहे.
प्रज्वल शिवानंद कारेगार या सोळा वर्षीय विद्यार्थ्यांचा अतिशय अमानुषरित्या निर्घृण पद्धतीने खून झाल्याने शिवाजीनगर आणि मुचंडी परिसरामध्ये एकच खळबळ माजली आहे. दरम्यान हा विद्यार्थी लिंगराज कॉलेज आवारातील जी. ए. हायस्कूलमध्ये इयत्ता दहावी शिकत असल्याची माहिती समोर येत आहे. काल बुधवारी शाळेतूनच त्याचे अपहरण झाले की काय? अशी शक्यता वर्तविण्यात आहे.
त्या अनुषंगाने शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्या बरोबरच संबंधित विद्यार्थ्याचे मारेकरी कोण व कोणत्या भागातील आहेत. खून नेमका कोणत्या कारणास्तव झाला याचा तपास सुरू आहे. मारीहाळ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून मारीहाळच्या पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली त्याचप्रमाणे खुनाची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
याबाबत असे समजते की सदर जिए हायस्कूलमध्ये शिकणारा विद्यार्थी काल रात्री उशिरापर्यंत शाळेतून घरी न परतल्यामुळे सर्वत्र शोधाशोध करून त्याच्या कुटुंबीयांनी मध्यरात्री पोलिसात तक्रार नोंदविली. त्यानंतर आज सकाळी एका शाळकरी मुलाचा खून झालेला अवस्थेतील मृतदेह मुचंडी गावानजीकच्या शेतवाडीमध्ये आढळून आल्याची घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार मयत मुलाचा चेहरा दगडाने ठेचण्यात आला असून त्याच्या पाठीवर तीक्ष्ण शस्त्राचे वार आढळले आहेत. त्यामुळे संबंधित मृतदेह हा बेपत्ता झालेल्या त्याशिवाजी नगर येथील विद्यार्थ्यांचा आहे अशी माहिती समोर आली आहे.घटनास्थळी डी सी पी रवींद्र गडादी यांनी भेट देऊन पहाणी केली पोलिसांनी अधिक तपास चालू केला आहे.
शिवाजी नगर येथील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मुचंडी शेतवाडीत निर्घृणपणे खून करण्यात आला आहे.मुचंडी येथील शेतवाडीत मारिहाळ पोलीस श्वान पथका सह तपास करतानाचा व्हीडिओ pic.twitter.com/Ub8hy9gew5
— Belgaumlive (@belgaumlive) October 20, 2022