पती निधनानंतर त्यांच्या पत्नीचे धार्मिक विधी स्मशानभूमीत न करता ते घरीच करण्यात यावेत, या मराठा समाज सुधारणा मंडळाच्या आवाहनानुसार गणेशपूर गल्ली, शहापूर येथील पंच व म. ए. समितीचे कार्यकर्ते कै. प्रकाश हंडे त्यांच्या पत्नीचे धार्मिक विधी स्मशानभूमीत न करता ते घरीच करण्यात आले.
मराठा समाज सुधारणा मंडळाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मराठा समाजातील एखाद्याच्या निधनानंतर 12 दिवसांऐवजी 7 दिवस दुखवटा पाळावा. तसेच पती निधनानंतर केले जाणारे महिलांचे विधी स्मशानभूमीत न करता ते घरीच करावेत, असे दोन महत्वपूर्ण ठराव संमत करण्यात आले आहेत.
या ठरावाला प्रतिसाद देताना गणेशपूर गल्ली, शहापूर येथील पंच व म. ए. समितीचे कार्यकर्ते कै. प्रकाश हंडे त्यांच्या पत्नीचे धार्मिक विधी स्मशानभूमीत न करता ते घरीच करण्यात आले.
मराठा समाज सुधारणा मंडळाच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागतही होत आहे. या ठरावाची अंमलबजावणी होण्यासाठी लवकरच विभागवार बैठका घेऊन आवाहन करण्यात येणार आहे. तरी गल्लीतील, भागातील किंवा गावातील पंच मंडळी, तरूण कार्यकर्ते व महिला मंडळानी पुढाकार घेऊन हे ठराव अंमलात आणावेत, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.