Friday, December 27, 2024

/

दिवाळीनिमित्त भव्य फ्री हँड रांगोळी स्पर्धा -2022

 belgaum

दीपावली निमित्त बेळगाव उत्तरचे लोकप्रिय आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आपल्या मतदारसंघातील माता भगिनींकरिता येत्या दि. 24, 25 व 26 ऑक्टोबर रोजी भव्य फ्री हँड रांगोळी स्पर्धा -2022 चे आयोजन केले आहे.

सदर भव्य रांगोळी स्पर्धा विविध 13 गटांमध्ये घेतली जाणार असून प्रत्येक गटातील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक बक्षीसं तसेच उत्तेजनार्थ पारितोषिकं दिली जाणार आहेत. स्पर्धेचे गट पुढील प्रमाणे आहेत.

गट क्र. 1 -चव्हाट गल्ली, शेट्टी गल्ली, कोळी गल्ली, भडकल गल्ली, खडक गल्ली. गट क्र. 2 -समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, गणाचारी गल्ली. गट क्र. 3 -बापट गल्ली, केळकर बाग, मारुती गल्ली, किर्लोस्कर गल्ली, कडोलकर गल्ली, रामदेव गल्ली. गट क्र. 4 -भातकांडे गल्ली, भोई गल्ली, पांगुळ गल्ली, कामत गल्ली, माळी गल्ली, टेंगीनकेरी गल्ली. गट क्र. 5 -मेणसी गल्ली, बुरुड गल्ली, रविवार पेठ. गट क्र. 6 -शिवाजीनगर, गांधीनगर.

गट क्र. 7 -रामलिंग खिंड गल्ली, कोनवाळ गल्ली (दोन्ही), बसवन गल्ली, अनुसुरकर गल्ली. गट क्र. 8 -कॅम्प एरिया. गट क्र. 9 -देशपांडे गल्ली, अनंतशयन गल्ली, कुलकर्णी गल्ली, शेरी गल्ली, मठ गल्ली. गट क्र. 10 -मुजावर गल्ली, रेडिओ टॉकीज रोड, पाटील मळा, पाटील गल्ली. गट क्र. 11 -भांदूर गल्ली, तानाजी गल्ली, संभाजी गल्ली, ताशिलदार गल्ली, फुलबाग गल्ली, देशपांडे चाळ पेट्रोल पंपच्या मागे. गट क्र. 12 -अलारवाड, बसवन कुडची, कणबर्गी, यमनापूर, बसवनकोळ, मुत्त्यानट्टी. गट क्र. 13 -शाहूनगर, नेहरूनगर, सदाशिवनगर, हनुमाननगर, टीव्ही सेंटर, आंबेडकरनगर, जाधवनगर, बसव कॉलनी, अन्नपूर्णावाडी.Rangoli on deewali

सदर स्पर्धेसाठी महिलांनी आपापल्या घरासमोर रांगोळी काढावयाची आहे. पाऊस असल्यास घरामध्ये रांगोळी काढावी. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या काळात 9731880983, 8880823251, 9906559903, 9902128832 अथवा 9591729304 या मोबाईल क्रमांकावर स्पर्धा काळात सकाळी 10 वाजण्यापूर्वी सेल्फी विथ रांगोळी व्हाट्सअप करावी.

आपल्या रांगोळीचा फोटो स्पर्धेचे परीक्षक किंवा कार्यकर्ते सकाळी 10 पूर्वी काढून घेऊन जातील. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 9449084479 किंवा 7795379271 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच माता-भगिनींनी बहुसंख्येने या स्पर्धेत भाग घेऊन आनंद लुटावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.