बेळगाव तालुक्यातील पूर्व भागातील लंपी स्किन रोगाने त्रस्त असलेल्या बैल आणि गायींना खाद्य वितरित करण्याचे कार्य श्रीराम सेना हिंदुस्थान आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या माध्यमातून करण्यात आले.
फेसबुक फ्रेंड सर्कल आणि श्रीराम सेना हिंदुस्थानच्या टीमने गुरुवारी बस्तवाड गावाला भेट दिली ज्यां शेतकऱ्यांच्या गायी आणि बैलांना लंपी रोगाचा त्रास झाला आहे त्यांना हे खाद्य वितरित करण्यात आले.
या टीमने सुरुवातीला बस्तवाड गावातील दर्शन बांडगी नावाच्या एका शेतकऱ्याला भेट दिली त्यांचा एक बैल २ दिवसांपूर्वीच दगावला आहे आणखी एका बैलावर उपचार सुरू आहेत त्या पीडित बैलासाठी 100 किलोचे खाद्य दिले सदर खाद्य पिशवी पूनम एम यांनी दिली होती.
यावेळी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर श्रीराम सेना हिंदुस्थानचे भरत नागरोळी,नारू निलजकर,संतोष पोटे,चेतन खन्नुकर,सूरज बागवे,प्रथमेश यादव मारुती बांडगी यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला होता.
पूर्ण गावाचा फिरून लंपीने त्रस्त जनावरांची माहिती घेतली त्यात एकूण 9 गायी बैल या रोगाने पीडित असल्याचे निष्पन्न झाले आहे ज्यांना कुणाला या जवानांना मदत म्हणून खाद्य द्यावयाचे आहे त्यांनी 9986809825 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या टीमच्या वतीने धामणे गावातील आणि पाटील मळा येथील जनावरांना सतत खाद्य मदत पुरवले जात आहे.