Tuesday, December 24, 2024

/

पिस्तुलीच्या धाकाने काजू व्यापाऱ्याचे लुटले 50 लाख

 belgaum

बेळगावहून येणाऱ्या एका काजू व्यापाऱ्याची कार अडवून मारहाण करण्याबरोबरच पिस्तुलीच्या धाकाने दरोडेखोरांनी त्याच्याकडील 50 लाख रुपये लुटल्याची घटना शिरसी (जि. कारवार) तालुक्यातील बनवासी येथे घडली.

मूळचे सिद्धापूरचे असणारे रहिवासी जाविद खान हे बेळगावहून येत असताना ही घटना घडलेली आहे. याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, जावेद खान हे बेळगाव येथे जमीन खरेदीसाठी गेले होते. त्यासाठी त्यांनी 50 लाख रुपयांची रोकड स्वतःकडे ठेवले होती.

मात्र मात्र काही अडचणीमुळे जमीन खरेदीचा व्यवहार न झाल्यामुळे ते मुंडगोंडू येथून दसनकोप्पा बनवासी मार्गे सिद्धापूरला निघाले होते. त्यावेळी पाच जणांच्या टोळक्याने कारमधून पाठलाग करून त्यांना रस्त्यात मध्येच अडवले.

जावेद यांनी आपली गाडी थांबवताच दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवत चाकूने त्यांच्या कारचे टायर सुद्धा पंक्चर केले.

तसेच जावेदला रोडने जबर मारहाण करून कार मधील 50 लाख रुपये हिसकावून त्या पाचही दरोडेखोरांनी पोबारा केला. या प्रकरणी बनवासी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.