वकिलांच्या ड्रेसकोड संदर्भात कर्नाटक स्टेट बार कौन्सिलने नुकताच एक आदेश जारी केले असून न्यायालयात सेवा बजावणाऱ्या वकीलांनी ड्रेसकोड संदर्भातील नियमावलीचे पालन करण्याचे पत्रकाद्वारे कळविले आहे.
कर्नाटक स्टेट बार कौन्सिलला कांही युवा वकील न्यायालयांमध्ये येताना जीन्स, स्पोर्ट्स शूज तसेच अन्य प्रकारचे कपडे परिधान करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
पुरुष व महिला वकिलांसाठी ड्रेसकोड काय असावा याबाबत स्पष्ट नियमावली असून त्याचे पालन व्हावे. जीन्स पॅन्ट , स्पोर्ट्स शूज वगैरे परिधान करून न्यायालयीन कामकाज करू नये असा उल्लेख आदेशात आहे. या आदेशाचे पुन्हा उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास गंभीरपणे त्याचा फेरआढावा घेण्यात येईल.
तेंव्हा सर्व वकिलांनी ड्रेसकोड संदर्भातील आदेशाचे काटेकोर पालन करावे. पांढरा शर्ट आणि त्यावर काळा कोट, गळ्यात टाय किंवा पांढरा नेक बँड हा बार कौन्सिलने वकिलांसाठी ठरविलेला ड्रेसकोड आहे. त्यानुसार ड्रेस अर्थात पोशाख परिधान करून न्यायालयात येत कामकाजात सहभागी व्हावे, असे पत्रकात नमूद आहे.
या संदर्भात बोलताना बेळगाव बार असोसिएशनची उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनी अलीकडे कांही वकील जीन्स स्पोर्ट्स शूज आणि फॅशनेबल कपडे परिधान करून न्यायालयात येत आहेत.
या संदर्भात स्पष्ट सूचना करण्यासह ड्रेसकोड संदर्भातील नियम पाळण्याबाबत सुधारित आदेश 13 ऑक्टोबर रोजी राज्य बार कौन्सिलकडून जारी झाल्या असल्याचे सांगितले.