गावात स्वच्छता अभियान राबवण्यासाठी ग्राम पंचायत सदस्यांनी पुढाकार घेत रात्रीच्या वेळी कचरा टाकणाऱ्याला समज दिली आहे.
कंग्राळी खुर्द येथे बेजबाबदार नागरिकांकडून रात्री 11.30 वाजता कंग्राळी मुख्य रस्त्यावर कचरा टाकून जाणाऱ्या लोकांवर पाळत ठेवत ग्रा पं सदस्यांनी पकडून त्याना चांगलीच समज दिली तसेच टाकलेला कचरा उचलून नेण्यास भाग पाडले .
ग्राम पंचायत सदस्य व जागरूक नागरिकांनी पाळत ठेवून स्वच्छतेसाठी कार्य केलेल्या कामाचे कौतुक होत आहे .कंग्राळी खुर्द गावाच्या मुख्य रस्त्यावरून ग्रा पंचायत व महानगर पालिका या दोन्ही संस्थांच्या कचरा गाड्या येतात तरी सुद्धा रामनगर पहिला क्रासच्या पुढे मुख्य रस्त्यावरच काही लोक वेळ चुकवून रस्यावरच कचरा टाकून जात होते .
त्यामुळे काही ग्रा पं सदस्य व नागरिक पाळत ठेवून होते . काल शनिवारी रात्री 11.30 वाजता रामनगर परिसरातील रहिवाशी रस्त्यावरच कचरा टाकून पलायन करत असतांना ग्राम पंचायत सदस्य प्रशांत पाटील , महेश धामणेकर , वैजनाथ बेन्नाळकर ग्रामस्थ चंद्रकांत मोरे , अमर काटे यांनी रंगेहाथ पकडून समज दिली व कचरा उचल करण्यास भाग पाडले .
रात्री सुद्धा पाळत ठेवत असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात असून लोकांनी कचरा गाडीचा वापर करून स्वच्छता राखावी असे आवाहन करण्यात आले आहे.