बेळगावमध्ये गेल्या चार दिवसात रस्ते अपघातात दोन विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेल्यानंतर प्रशासनासह आता पालकांनाही जाग आली आहे. आपल्या मुलांना आपण शाळेसाठी पाठवतो मात्र आपली मुले कितपत सुरक्षित आहेत? असा प्रश्न आता पालकांना पडू लागला आहे.
बेळगावमध्ये झालेल्या अपघातानंतर पालकांनी थेट वाहतूक व्यवस्थापनासाठी रहदारी उपायुक्तांकडे धाव घेतली आहे. बेळगाव शहरात अवजड वाहनांना बंदी घालावी, कॅम्प परिसरात गतिरोधक बसवावेत, शाळेच्या वेळेत रहदारी पोलिस तैनात करण्यात यावेत यासह रस्ते वाहतुकीसाठी नियमानुसार आणि योग्य आराखड्यानुसार बदल करण्यात यावेत, गतिरोधकांसाठी पांढऱ्या रंगाचे पट्टे, तसेच कॅट आय बसविण्याची सुविधा द्यावी, अशा मागण्यांचे निवेदन गुरुवारी सकाळी कॅम्पवासियांनी शाळांच्या पालकानी सादर केले.
बुधवारी एका शालेय विद्यार्थ्याचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतरही जागे न झालेल्या पोलिसांनी पुन्हा बेजबाबदारपणा दाखवल्याने कॅम्प येथील नागरिकांनी आज सकाळी खानापूर रस्त्यावर आंदोलन केले. बेळगावमधील रहदारीच्या समस्या दिवसागणिक वाढत चालल्या आहेत. मात्र रहदारी नियंत्रणासाठी तैनात करण्यात आलेले पोलीस हेल्मेट सक्ती, कागदपत्रे तपासण्यात व्यस्त आहेत.
बेळगावमधील रहदारी आणि वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली असून ज्या ज्या ठिकाणी शाळा आहेत त्या त्या ठिकाणी रहदारीसंदर्भात आराखडा तयार करून योग्य पद्धतीने वाहतूक वाळवावी, अवजड वाहनांना अशा परिसरात बंदी घालावी, मुंबईच्या धर्तीवर वाहतूक नियम ठरवावेत, वाहतुकीचे फलक योग्य ठिकाणी आणि ठळक अक्षरात लिहिले जावेत अशी मागणी पालकांनी केली आहे. या सर्व सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाकडे अपुरा निधी असेल तर त्या निधीचीही व्यवस्था पालक करतील, अशा कानपिचक्याही आज पालकांनी दिल्या आहेत.
यासंदर्भात कॅम्प येथील रहिवाशांनी आंदोलन छेडले आंदोलनाची माहिती मिळताच वाहतूक विभाग एसीपी शरणप्पा, कॅम्प पोलीस स्थानकाचे सीपीआय प्रभाकर धर्मट्टी आणि वाहतूक दक्षिण विभाग पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. दरम्यान यांच्यासोबत कॅम्प मधील शाळा मधले पालक शिक्षणाधिकारी आणि अन्य पोलिसांची बैठक झाली.
Belgaum Police are interested only collecting money from Normal working people by harrassing them in the name of document verification everyday, especially near Hindalga Ganapati & Vanita Vidhyalaya.
They are least bothered about uncontrolled traffic. Workers like mason & Carpenters have to pay them the daily wages earnings.
Its shame on Belgaum Police, inspite of death of two innocent children, there is no improvement, even after instructions from State DIG.