मागील पंधरा दिवसापासून रेस कोर्सच्या मैदानात ठाण मांडून बसलेल्या बिबट्याला पकडण्यात अजूनही वनखात्याला यश आलेले नाही.बिबट्याची हुलकावणी नागरिकांसाठी भीतीदायक ठरत असून नागरिकांमध्ये धास्ती वाढली आहे.यामुळेच बिबट्याच्या शोध मोहिमेचा मोठा टप्पा म्हणून शुक्रवारी रेसकोर्स परिसरात पोलीस अधिकारी आणि वनाधिकारी यांची मोठी टीम बिबट्याला शोधण्याच्या मोहिमेत दाखल झाली आहे. यामुळे रेस कोर्स परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
रेस कोर्स परिसरात वारंवार बिबट्या चे दर्शन नागरिकांना होत असून यामुळे शुक्रवारी वनविभाग आणि पोलीस अधिकारी रेस कोर्स परिसरात मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. रेस कोर्स परिसरात बिबट्या टेन्ट करून असल्याचे असल्याने या भागातच शोध मोहीम वाढवणे आवश्यक असल्याचे दिसून आले असून यामुळेच वनविभाग ॲक्शन मोडमध्ये आला आहे. ट्रॅप कॅमेरे,सीसीटीव्ही,पिंजरे लावून देखील बिबट्या अजूनही यामध्ये अडकला नसून यामुळे शोध मोहिमेत वाढ करण्यात आली आहे
मागील पंधरवड्यापासून वनविभाग डोळ्यात तेल घालून या ठिकाणी बिबट्याच्या शोध मोहिमेत गुंतला आहे तरी देखील सातत्याने बिबट्या हुलकावणी देत असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वनविभाग पुन्हा नव्याने सज्ज झाला आहे बिबट्याचे दर्शन तीन ते चार वेळा झाले असून रेस कोर्स परिसरातच वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस विभागाची मोठी टीम दाखल झाली आहे यामुळे मिशन बिबट्या साठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले.
डीसीपी रवींद्र गडांनी एसीपी एन व्ही भरमनी सहा शहरात परिसरातील दिग्गज पोलीस अधिकारी आणि वन खात्याचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू असून शेकडो पोलीस आणि मनकाचे कर्मचारी यात सहभागी झालेले आहेत