वन्य जीवींचे तज्ञ, जंगली प्राण्यातून वावरलेले तानाजी पाटील यांनी गोल्फ कोर्स परिसराला भेट दिली आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
खानापूर तालुक्यातील जंगलात वास्तव्य केलेले तानाजी पाटील यांना जंगली प्राण्यांच्या वावराबाबत अभ्यास आहे ते प्रसिद्ध नेमबाज देखील आहेत नरभक्षक प्राण्यांना कसे नियंत्रित करता येईल त्याचा अभ्याद त्यांना आहे. त्यांनी गोल्फ क्लब परिसरात बिबट्याला पिंजऱ्यांत अडकवण्यासाठी सुरू असलेल्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सहभागी वरिष्ठ वन अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी माजी महापौर विजय मोरे,सामाजिक कार्यकर्ते अलन मोरे, खानापूर समितीचे मुरलीधर पाटील आदी उपस्थित होते. करंबळ गावचे रहिवासी असलेले तानाजी पाटील यांनी बिबट्याला कश्या पद्धतीने जेरबंद करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी जंगलातील आपले अनुभव सांगून जर अधिकृत रित्या मदत लागली तर आपल्याला जरूर कळवावे, त्यानुसार वन खात्याला ‘मिशन बिबट्या जेरबंद’ या मोहिमेत मदत करण्याची तयारी हि त्यांनी दर्शविली आहे.
मंगळवारी वन खात्याकडून बिबट्याला पकडण्यासाठी हत्तीचा देखील वापर केला जाणार आहे.कोंबिंग ऑपरेशन मधील ताफ्यात आणखी शार्प शूटर्स सहभागी होणार आहेत.